|Friday, January 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मोदी-क्षी जिनपिंग चर्चेची पाकला धास्ती

मोदी-क्षी जिनपिंग चर्चेची पाकला धास्ती 

मैत्रीला गंज लागू देणार नसल्याचे चीनचे विधान

वृत्तसंस्था/ बीजिंग

चालू आठवडय़ात चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात होणाऱया चर्चेमुळे पाकिस्तानच्या चिंता वाढल्या आहेत. या चिंतेची दखल घेत चीनने पाकिस्तानला नवे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान मोदींसोबत होणाऱया भेटीनंतर देखील दोन्ही देशांचे संबंध पूर्वीप्रमाणे राहतील, असे चीनने पाकिस्तानला कळविले आहे.

चीन आणि पाकिस्तान परस्परांना सर्वकालीन मित्र संबोधितात आणि त्यांची मैत्री देखील भारताच्या नजरेत संशयास्पद राहिली आहे. परंतु अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या तणावानंतर देखील पंतप्रधान मोदींनी बीजिंगसोबत सीमा वादापासून निर्वासित तिबेटी धर्मगुरु दलाई लामापर्यंत सर्व मुद्यांवर संबंध सुधारण्यासाठी पाऊल उचलले आहे. मोदी आणि जिनपिंग यांच्यात शुक्रवारी चीनमध्ये अधिकृत चर्चा होणार आहे.

बीजिंगमध्ये पार पडलेल्या बैठकीत चीनचे विदेश मंत्री वांग यी यांनी चीन दृढपणे पाकिस्तानला समर्थन देत राहणार असल्याचे आश्वासन पाक विदेशमंत्री ख्वाजा आसिफ यांना दिले. मोदी आणि जिनपिंग यांच्यात होणाऱया चर्चेनंतर चीन आणि पाकच्या संबंधांमध्ये कोणताही बदल घडून येणार नाही. राष्ट्रीय कायापालट आणि समृद्धता-विकासाच्या महान स्वप्नाला सत्यात उतरविण्याच्या ऐतिहासिक मोहिमेसाठी सोबत काम करण्यास तयार असल्याचे वांग यी म्हणाले. पाकिस्तानसोबत पोलादासमान असणाऱया मैत्रीला कधीच गंज चढणार नसल्याचे वांग यांनी म्हटले.

Related posts: