|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कै. बाबूकाका शिरगांवकर मानांकन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेस प्रारंभ

कै. बाबूकाका शिरगांवकर मानांकन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेस प्रारंभ 

प्रतिनिधी /सांगली :

नुतन बुद्धिबळ मंडळाच्या वतीने 51 व्या सांगली बुद्धिबळ महोत्सवातील कै. बाबूकाका शिरगांवकर मानांकन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच रविवार पासून प्रारंभ झाला. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. शरद घाडगे व डॉ. विजय कुरडे यांच्याहस्ते प्रतिमा पुजन व पटावरिल चाल खेळून उद्घाटन करण्यात आले. यावेळी सौ. विद्या कुरडे, चिंतामणी लिमये, प्रा. रमेश चराटे, कुमार माने, विजय आपटे आदी उपस्थित हेते.

  या स्पर्धेला महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान, प. बंगाल, गोवा, आदी राज्यातील 191 बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत. पुण्याचे रवि भावे, प. बंगालचा फिडे मास्तर जयदीप दत्ता, आतंर राष्ट्रीय महिला मास्टर साक्षी चितलांगे, समरत गोरिया, पुण्याचा रणवीर मोहिते, कोल्हापूरचा अनिश गांधी, एक्साईजचे किरण पंडीतराव, वेदांत पिंपळखरे, मिरजेचा मुदस्सर पटेल, सांगलीचे विलास मोघे, पुण्याचा समीर इनामदार, मुंबईची विश्वा शहा, जैल दिगंबर, कोल्हापूरचा श्रीराज भोसले, आयुष महाजन, आदित्य सावळकर, निहाल अहमद मुल्ला, यश कापडिया, प. बंगालचा स्वयंम बरण, संजीव मिश्रा, श्रेयस घाडी, ठाणेचा अंकुर गोखले, अंजनेय फाटक, गोव्याचा आयुष शिरोडकर, चिपळूणचा प्रविण सावर्डेकर, यांच्यासह 120 मानांकित खेळाडू  सहभागी झाले आहेत.

  याप्रसंगी पहिल्या फेरीत रवि भावे, जयेश मयेकर, जयदीप दत्ता, समरत घोराई, रणवीर मेहिते, अनिश गांधी, वेदांत पिंपळखरे, विलास मोघे, समीर इनामदार, जैल दिगंबर, श्रीराज भोसले, निहाल अहमद मुल्ला, यश कापडिया, संजीव मिश्रा यांच्यासह 90 खेळाडूंनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत पहिल्या फेरीअखेर एक गुण मिळवला. स्पर्धेचे पंच म्हणून आतंरराष्ट्रीय पंच राजेंद्र शिदोरे, विवेक सोहनी, जयश्री पाटील, जुईली कुलकर्णी, डांगे, विकास पवार, दिपक वायचळ आदी काम पहात आहेत.