|Thursday, January 17, 2019
You are here: Home » leadingnews » येडियुरप्पांच्या मुख्यमंत्रीपदाचा फैसला ; सुप्रिम कोर्टात सुनावणी

येडियुरप्पांच्या मुख्यमंत्रीपदाचा फैसला ; सुप्रिम कोर्टात सुनावणी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सत्ता स्थापनेवरून कर्नाटकात निर्माण झालेला पेज आज सुटण्याची शक्यता आहे.कारण यासंदर्भात सुप्रमीम कोर्टात आज फैसला होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री येरियुरप्पा किती काळ आपल्या पदावर टिकून राहतात हे स्पष्ट होणार आहे.

राज्यपालांकडून भाजपला सरकारस्थापनेचे आमंत्रण मिळताच बुधवारी रात्री काँग्रेस- जेडीएसने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचे रजिस्ट्रार कार्यालय गाठून तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. येड्डीयुरप्पा यांचा शपथविधी स्थगित करावा, या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी न्या. ए. के. सिक्री, शरद बोबडे व अशोक भुषण यांचे खंडपीठ स्थापन करण्यात आले. रात्री सव्वादोन वाजता याचिकेवर सुनावणी सुरू झाली. काँग्रेस नेते व ज्ये÷ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी बहुमत नसलेल्या पक्षाला सरकारस्थापनेसाठी बोलवण्याच्या राज्यापालांच्या कृतीस हरकत घेतली, तर भाजपची बाजू मांडणाऱया मुकुल रोहतगी यांनी, राज्यपालांसारख्या घटनात्मक पदाच्या निर्णयाला न्यायसंस्थांनी अडकाठी आणू नये, अशी बाजू मांडली. अखेर खंडपीठाने काँग्रेस-जेडीएसची मागणी फेटाळत शपथविधीचा मार्ग मोकळा केला. मात्र, त्याचवेळी येड्डीयुरप्पा यांनी राज्यपालांना सादर केलेल्या पत्राची प्रत सादर करण्याचा आदेश दिला व पुढील सुनावणी आज सकाळी ठेवली आहे. सकाळी 10.30 वाजता ही सुनावणी होणार आहे. न्यायालय आदेशानंतर गुरुवारी सकाळी येड्डीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, राज्यपालांचा निर्णय न्यायालयीन कचाट्यात सापडल्याने या शपतविधीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी उपस्थित राहणे टाळले.

 

 

 

 

Related posts: