|Sunday, August 25, 2019
You are here: Home » leadingnews » पालघर निवडणुकः उद्धव ठाकरे आज युतीसंदर्भात घेणार निर्णय

पालघर निवडणुकः उद्धव ठाकरे आज युतीसंदर्भात घेणार निर्णय 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युतीला तडा जाण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पाच पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते भाजपसोबतची युती तोडण्याची आणि सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा करण्याची शक्मयता आहे.

उद्धव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली तर राज्य सरकार अस्थिर होण्याची शक्मयता आहे. पालघर पोटनिवडणुकीत भाजपच्या राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा पराभव केला. मात्र या निवडणुकीत शिवसेनेना आणि भाजपने या सत्तेतील मित्रपक्षांनी एकमेंकावर तुफान टीका केली होती. त्याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑडिओ क्लिप जारी केली होती. त्यामध्ये मुख्यमंत्री पालघर निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना साम-दाम-दंड-भेद वापरण्याचे आदेश देत होते. त्यावरूनही शिवसेना-भाजपमधील तणाव वाढला आहे. शिवाय गेल्या चार वर्षातील शिवसेना-भाजपचे संबंध पाहता, उद्धव ठाकरे आज काही निर्णय घेतात का हे पाहणे औत्सुक्मयाचे आहे.