|Saturday, December 15, 2018
You are here: Home » Top News » काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून जवानाचे अपहरण

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून जवानाचे अपहरण 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी आज सैन्याच्या एका जवानाचे अपहरण केले. औरंगजेब असे अपहृत जवानाचे नाव असून ते पुंछ जिह्याचे रहिवासी आहेत. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

औरंगजेब हे हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर समीर टायगरला कंठस्नान घातलेल्या कमांडो ग्रुपचा सदस्य होते. राज्याच्या पोलिसांसह सगळय़ांनीच जवानाच्या शोधासाठी या परिसरात मोठय़ स्तरावर सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. औरंगजेब हे 44 राष्ट्रीय रायफल्सचे जवान असून त्यांची पोस्टिंग 44 शादीमार्गमध्ये होती. ईदच्या सुट्टीसाठी घरी परतताना, दहशतवाद्यांनी मुघल रोडवर त्यांचं अपहरण केलं. औरंगजेब हे अँटी-टेरर ग्रुपचे सदस्य आहेत. औरंगजेब सकाळी नऊच्या सुमारास एका खासगी वाहनातून शोपियांच्या दिशेने येत होते. त्यावेळी कलमपोराजवळ अतिरेक्मयांनी वाहन अडवलं आणि त्यांचं अपहरण केले.

Related posts: