|Thursday, February 27, 2020
You are here: Home » क्रिडा » आयसीसीसमोर चंडीमलची लवकरच सुनावणी

आयसीसीसमोर चंडीमलची लवकरच सुनावणी 

वृत्तसंस्था/ दुबई

विंडीज आणि लंका यांच्यातील सेंट लुसिया येथे सुरू असलेल्या दुसऱया क्रिकेट कसोटीत खेळाच्या दुसऱया दिवशी लंकेचा कर्णधार दिनेश चंडीमलवर चेंडू कुरतडण्याचा आरोप करण्यात आला. चंडीमलने चेंडूचा आकार बदलण्याचा प्रयत्न केला. तथापि या प्रकरणी चंडीमलला लवकरच आयसीसीसमोर सुनावणीसाठी हजर राहावे लागेल.

कर्णधार चंडीमलने या कसोटीतील शुक्रवारी खेळाच्या दुसऱया दिवशी आपल्या खिशातून चॉकलेटसारखी वस्तू तोंडात घातली, तत्पूर्वी त्याने चेंडूवर कृत्रिम द्रवाचा वापर केल्याचे फूटेजमध्ये आढळून आले. या प्रकरणी आपण दोषी नसल्याचे प्रतिपादन चंडीमलने केले आहे. या घटनेनंतर लंकन संघाने निषेध नोंदवून शनिवारी खेळाच्या तिसऱया दिवशी दोन तास उशिरा मैदानात प्रवेश केला. 28 वर्षीय चंडीमलवर आयसीसीने चेंडू कुरतडणेचा आरोप निश्चित केला असून त्याने आयसीसीच्या नियमावलीचा भंग केल्याचेही म्हटले आहे. आता या सामन्यातील सामनाधिकारी जावगल श्रीनाथ यांच्या पॅनेलसमोर चंडीमलला सुनावणीसाठी उपस्थितीत राहावे लागेल.

Related posts: