|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

फांद्या, डहाळय़ा तोडून वटपौर्णिमेचे पूजन करणे धोकादायक

बुध. दि. 27 जून ते 3 जुलै 2018

भारतीय संस्कृतीत नवीन लग्न झालेल्या गृहिणी आपल्या पतीचे आरोग्य चांगले रहावे, त्याला दीर्घायुष्य लाभावे यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात. त्या अनुषंगाने सत्यवान सावित्री व्रताचे महात्म्य वाचून वटपौर्णिमेला वटवृक्षाचे पूजन करतात. पण वटसावित्री व्रताचे खरे महत्त्व काय आहे याकडे कुणीच लक्ष देत नाहीत. वटवृक्ष हा शितल छाया व प्रचंड प्रमाणात प्राणवायू सोडणारा वृक्ष आहे. याचे संवर्धन करणे त्याची जोपासना करणे व त्यायोगे वायू प्रदूषण नष्ट करणे हा त्यामागील हेतू आहे, पण लोक वटवृक्षाचे संवर्धन करण्याचे सोडून त्याच्या फांद्या व डहाळय़ा तोडून आणतात व त्याची पूजा करतात. वटवृक्षाला दोरे गुंडाळतात अशाने काहीही साध्य होणार नाही. एक दिवस वटवृक्षाला दोरे गुंडाळून पूजा केली म्हणजे पतीचे आयुष्य वाढते हे सुशिक्षित मनाला पटत नाही. वास्तविक पती पत्नीने परस्परातील मतभेद विसरुन कायम प्रेमाने रहावे व दोघांनीही वटवृक्षासारखे विशाल मन ठेवून आनंदाने संसार करावा. निसर्गसंपदेचे रक्षण करावे हा या व्रतामागील खरा हेतू आहे. फक्त स्त्रियानीच हे व्रत का करावे, पुरुषांनी सुद्धा आपल्या पत्नीचे आयुष्य वाढावे, ती सुखी  रहावी यासाठी हे व्रत का करू नये?  अशी विचारधाराही काहीवेळा ऐकू येते व त्यात चुकीचे काहीही नाही. वास्तविक वडाचे महत्त्व, त्याचे औषधी उपयोग, त्याची दैवी शक्ती तसेच त्याच्या पूजनाने कोणत्या शक्तीप्राप्त होतात, या वृक्षांचे संवर्धन केल्याने प्रदूषण कसे नष्ट होते, याबाबत पुरोहित वर्गाने जागृती करण्याची गरज आहे. कारणं वटवृक्षाशी अधिकाधिक संबंध ब्रह्मवृंदांचाच येतो. वटवृक्षाच्या समीधा होमात वापरल्याने काय फळ मिळते, कोणत्या देवाशी संबंधित कार्य होते, याची कल्पनाही देणे आवश्यक आहे. पण सहसा तसे घडत नाही. पौराणिक कथेलाच हे लोक कवटाळून बसलेले आढळतात. जी जी धार्मिक व्रते सांगितलेली आहेत त्या प्रत्येकामागे काही ना काही सामाजिक कारणे आहेत. लोकांना त्याचे ज्ञान झाले तर लोक डोळस बुद्धीने व्रते करू लागतील व कोठेही अंधश्रद्धेला वाव राहणार नाही. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी ज्यावेळी मोठमोठी  संकटे येतात. त्यावेळी नास्तिक व्यक्तीसुद्धा देवाधर्माच्या मागे लागते. डॉक्टर कितीही तज्ञ असले तरी शस्त्रक्रियेची हमी देत नाहीत, देवावर भरोसा ठेवा असेच सांगतात. हल्ली जग सुशिक्षित होत आहे. खरे खोटे ओळखण्याची पात्रता त्यांच्यात आहे. त्यामुळे पूर्वीच्या काही परंपरा व रुढी आता कालमानानुसार बदलण्याची गरज आहे. वटवृक्षाखाली बसून जर सर्वांनी महामृत्यंजयाचा जप केला तर खऱया अर्थाने यमाला माघारी पाठविल्याचा हेतू साध्य होईल. कारण मृत्यंजय मंत्र हा एकच मंत्र असा आहे की ज्याला यमराज घाबरतात. लक्ष्मी पूजनाला उस लावून आरास करतात पण लक्ष्मीला उसाचा रस प्रिय आहे. त्यासाठी उसाच्या रसाने लक्ष्मीला अभिषेक करावा, असे पूर्वीची माणसं सांगतात. पण ते घडलेले कुठे दिसत नाही. यासाठीच कोणतीही व्रत वैकल्ये करताना त्यामागील शास्त्राrय व सामाजिक कारणांचा अभ्यास केल्यास लोक आवडीने व्रते करू लागतील व या व्रतांना कुणी अंधश्रद्धा म्हणणारही नाहीत. सौभाग्यवती स्त्रियांनी वटवृक्षाचे पूजन जरुर करावे पण त्याच्या फांद्या व डहाळय़ा तोडून त्याची पूजा केल्यास संसार कधीही सुखाचा होणार नाही हे लक्षात ठेवावे.

 

मेष

आनंददायी ध्वज योगावरील वटपौर्णिमा आर्थिक भरभराट नोकरी व्यवसायासह सर्व बाबतीत शुभ फळ देणारी आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. व्यवसायात  नवीन सुधारणा कराल. दूरवरचे प्रवास, भाग्योदय तसेच धाडस व धडाडी असलेल्या कोणत्याही क्षेत्रात चांगले यश मिळवाल. मालक कर्मचारी संबंध चांगले राहतील.


वृषभ

आजची शुभयोगावरील वटपौर्णिमा दैवी आशीर्वाद देणारी आहे. गुरुचे भ्रमण अतिशय चांगले असल्याने सर्व कामात मोठे यश व जुन्या अडगळीत गेलेल्या वस्तूतून अनेक लाभ होत राहतील. वैयक्तिक जीवनात महत्त्वाचे योग. नव्या पाहुण्यांचे आगमन तसेच धनलाभाच्या संधी येतील. भागिदारीचे व्यवसाय सुरू करण्यास हरकत नाही. घरात लग्न कार्याची बोलणी सुरू होतील.


मिथुन

ध्वज व कार्यसिद्धी योगावर पौर्णिमा होत आहे. धनलाभाची शक्मयता. हा योग चांगल्या गोष्टी घडवील. त्यात वाढ होईल. या पौर्णिमेपासून आर्थिक नियोजन सुरू करा. बँकेत खाते उगडा, त्यात पैसा साठू लागेल. शनि, मंगळाचा योग चांगला नाही.दगदग, मोठे खर्च, एखादी अप्रिय घटना, आजारपण असे प्रकार घडण्याची शक्मयता आहे. नोकरीत असाल तर वरि÷ांची मर्जी राखण्याचा  प्रयत्न करा.


कर्क

ध्वज योगावरील वटपौर्णिमा सर्व कामात यश. शंततीलाभ, आर्थिक सुधारणा  तसेच कौटुंबिक सौख्य वाढविणारी आहे. अनेक बाबतीत शुभ फलदायक आहे. धनलाभाची शक्मयता. खानदानी घराण्यातील मित्र जोडले जातील पण शनि, मंगळाचा अशुभ योग सुरू आहे. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. कुणाशीही कोणतेही व्यवहार करताना गैरसमज निर्माण होऊ देऊ नका.


सिंह

ध्वज व कार्यसिद्धी योगावरील आजची वटपौर्णिमा हा एक अत्यंत शुभ योग आहे. नोकरी मिळणे, धनलाभ, अडकलेले पैसे वसूल होणे, वाहन योग, नवे स्नेहसंबंध, प्रवासात लाभ, नोकरीत उच्च पदप्राप्ती असे या योगाचे गुणधर्म आहेत. शत्रुंच्या कारवाया थंड पडतील, जुने घरदार व जुने वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होईल. शनि, मंगळ अशुभ योगात असल्याने अपघात होण्याची शक्मयता.


कन्या

ध्वज योगावरील आजची वटपौर्णिमा काही बाबतीत शुभ आहे. ज्या शुभ घटना घडतील त्यात मोठय़ा प्रमाणात वाढ होईल. लग्न, मुंज अथवा तत्सम शुभ कार्यात भाग घ्याल. मंगल कार्यासाठी प्रवास घडतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. महत्त्वाच्या कामात दैवी सहाय्य लाभेल. शनि, मंगळ अशुभ योगामुळे करार मदार तसेच कोठेही सही करताना काळजी घ्या. बेसावध राहू नका.


तुळ

ध्वज शुभयोगावरील वटपौर्णिमा अनेक बाबतीत यश देणारी आहे. आर्थिक कामांना गती मिळेल. धनलाभाची शक्मयता, डोळय़ांचे विकार कमी होती. अडलेल्या बऱयाच कामांना गती मिळेल. गैरसमज निवळतील, हाती पैसा खेळू लागेल. नोकरी व्यवसायातील अडलेली कामे सुरू होतील. घरातील वातावरण आनंदी व समाधानी राहील. व्यावसायिक जीवनात काही महत्त्वाचे फेरबदल शक्मय.


वृश्चिक

धनस्थानी होत असलेली ध्वज योगावरील वटपौर्णिमा सर्व कामात यश देणारी आहे. आरोग्य सुधारेल. संबंध तोडलेली माणसे पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न करतील. कार्यक्षमता चांगली असेल. नियोजन चांगले व शिस्तबद्ध असाल. कमाई व खर्चाचा जमाखर्च नीट ठेवत असाल हा आठवडा चांगला जाईल. अवघड व्यावहारिक कामे पूर्ण होतील.


धनु

तुमच्या राशीतच ध्वज योगावरील वटपौर्णिमा होत आहे. शुभ असल्याने आध्यात्मिक बाबतीत चांगले अनुभव येतील. आर्थिक व्यवहार सुरळीत चालू लागतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खरेदी विक्री, मंगल कार्याच्या दृष्टीने चांगले योग. अवघड शिक्षणात उत्तम यश, नोकरीत उच्च पद मिळण्याचे योग, शनि, मंगळाचा योग चांगला नाही. नको ती जबाबदारी अथवा बॅगा कुणाचे साहित्य वगैरे ठेवून घेऊ नका.


मकर

ध्वज योगावरील पौर्णिमा अतिशय शुभ आहे. वैवाहिक जीवनातील कटकटी मिटतील. नोकरी व्यवसाय असेल तर चांगले योग. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील पण, उष्णता व पित्तप्रकृती असलेल्यांनी काळजी घ्यावी. आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. व्यावसायिक प्रगतीची जोरदार घोडदौड सुरू होईल.


कुंभ

दीर्घकाळ संतती नसलेल्यांना आनंदाची बातमी कळेल. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल योग. वास्तू संदर्भातील समस्या दूर होतील. वास्तुविषयक कामात चांगले यश मिळेल. बढती, बदली तसेच नवे काम करण्याची संधी मिळेल. शनि, मंगळ अशुभ योगामुळे वादविवाद व त्यामुळे कटुता निर्माण होईल. अपचन, पोटदुखी व पित्तविकारापासून जपावे लागेल.


मीन

वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील. प्रवास, घर दुरुस्ती, नवे करारमदार, अडकलेली रक्कम परत येणे, वाहन, वास्तू वगैरे होण्याच्या दृष्टीने चांगले योग. सरकारी कामे, धनलाभाच्या सुवर्ण संधी उपलब्ध होतील. क्रीडाक्षेत्रात असाल तर अतिरेक करू नका. एखादा खेळ जीवनाचे नुकसान करण्याची शक्मयता. वटपौर्णिमा सर्व बाबतीत शुभ आहे.

Related posts: