|Saturday, July 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कोकणातील यशाचा भाजपा पॅटर्न

कोकणातील यशाचा भाजपा पॅटर्न 

विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. विरोधकांवर मात करत डावखरे यांनी विजय मिळवला. समोर आलेला मुद्दा एवढाच असला तरी प्रत्यक्षात त्याचे अन्वयार्थ समजून घेण्यासारखा आहे. 

 

विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या निरंजन डावखरे यांना 32,831 मते पडली तर संजय मोरे या शिवसेना उमेदवारांना 24,704 मते पडल़ी राष्ट्रवादी काँगेसचे नजीब मुल्ला यांना 14,821 मते पडल़ी निरंजन डावखरे हे गेली 6 वर्षे या मतदार संघात आमदार म्हणून कार्यरत होत़े ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत होत़े त्यांचे वडील वसंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्यावेळची निवडणूक पार पडली हेत़ी कोणतीच भूमिका न घेणाऱया समाजघटकांना आपल्या बाजूला वळवण्याचे कौशल्य वसंतरावांकडे होत़े एवढेच काय ते विरोधकांपैकी काही लोकांना आपलेसे करण्याची किमया करत असत़, असे राजकीय क्षेत्रात बोलले जात होत़े या सगळ्याचा लाभ निरंजन यांना 6 वर्षापूर्वी झाल़ा

जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे प्रस्थ आह़े पक्षांतर्गत दबदबा असलेले हे नेते डावखरे कुटुंबीयांचे विरोधक म्हणून ओळखले जातात़ त्यांच्यासारख्या पक्षांतर्गत विरोधकांवर मात करणे 6 वर्षापूर्वी निरंजन यांना वसंतरावांमुळेच शक्य झाल़े आव्हाड यांच्याविरुद्ध अनेकवेळा पक्ष नेतृत्वाकडे तक्रारी करून झाल्या पण आव्हाड यांना आवर घालणे नेतृत्वालाही शक्य झाले नाह़ी त्यानंतर त्यांनी पक्षांतर्गत कलहाचे कारण सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला आणि भारतीय जनता पक्षाचे कमळ हाती घेतल़े

विरोधकांमधील निवडून येणाऱया चेहऱयांना पक्षात प्रवेश देण्याचा धडक कार्यक्रम भाजपा राबवत असल्याची टीका अजितदादा पवार यांनी यानंतर केली होत़ी राजेंद्र गावीत यांचा भाजपात प्रवेश आणि त्यानंतर पालघरमधून विजय या उदाहरणाच्या पार्श्वभूमीवर डावखरे यांचा भाजपा प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा मुद्दा ठरल़ा

6 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत डावखरे यांच्याकडून भाजपाला पराभव स्वीकारावा लागला होत़ा गेल्या 6 वर्षात परिस्थिती पालटल़ी राज्यात व केंद्रात भाजपा सरकार कार्यरत झाले तरीही कोकण पदवीधर संघात भाजपाची परिस्थिती फारशी मजबूत झालेली नव्हती असा अंदाज मुख्यमंत्र्यांनी घेतल़ा यातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराला भाजपा प्रवेशाचे अवताण देण्यात आल़े आयारामांना पदे दिली जातात हा आक्षेप आला तरी हरकत नाही परंतु निवडणूक म्हटल्यावर यश महत्त्वाचे हे लक्षात घेऊन पक्ष नेतृत्वाने डावखरे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल़ा

निवडणुकीनंतरची आकडेवारी पाहता भाजपाचा निर्णय त्या पक्षासाठी योग्य ठरल़ा डावखरे यांच्यापैकी अन्य कोणाला उमेदवारी मिळाली असती तर पक्षाला यश मिळवणे अवघड ठरले असत़े डावखरे यांचा विजय 8 हजार मतांच्या अधिक्याने झाला असला तरी सुरुवातीपासूनच्या फेऱयांमध्ये त्यांची शिवसेनेच्या मोरे यांच्याशी कडवी झुंज झाल्याचे दिसून आल़े

पहिल्या पसंतीच्या तीन फेऱयांमध्ये 29,035 मते मिळाली असली तरी अपेक्षित कोटा डावखरे मिळवू शकले नाहीत़ म्हणून दुसऱया फेरीची मोजणी सुरू झाल़ी या फेरीमध्ये संजय मोरे व नजीब मुल्ला सांख्यिकी नियमांप्रमाणे बाद ठरल़े त्यानंतर डावखरे यांचा विजय झाल़ा दुसऱया फेरीची मते मोजत असताना संजय मोरे यांना ज्यांनी पहिल्या पसंतीची मते दिली त्यांची मते मोजण्यात आल़ी त्यावेळी मोरे यांच्या म्हणजे शिवसेनेच्या 10 टक्के मतदारांनी भाजपच्या डावखरे यांना मतदान केल़े

शिवसेना पक्ष प्रमुख भाजपाच्या विरोधात दररोज वेगवेगळी विधाने करत असतात वैचारिक संदेश आपल्या कार्यकर्त्यांना व मतदारांना देत असतात़ भाजपाला सत्तेवरून दूर केल्याशिवाय शिवसेनेला बरे दिवस येणार नाहीत या विचारांना पेंद्रस्थानी ठेवून मांडणी होत असत़े ते सूत्र मतदारांपर्यंत झिरपल्याचे दिसून येत़े दुसऱया पसंतीची मते दिलेल्या शिवसेनेच्या 90 टक्के मतदारांनी राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला अथवा अन्य उमेदवारांना मतदान केले आहे हे अधोरेखित केले म्हणजे पक्षप्रमुखांचे विचार मतदारांपर्यंत किती पोहोचले आहेत, ते दिसून येईल़ मतदान होण्यापूर्वी भाजपाकडून शिवसेनेवर अनेक आरोप करण्यात येत होत़े भाजपाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे पडद्यामागे सुत जमल्याचे आरोप होत होत़े

या मतदार संघात यापूर्वी कधीही शिवसेनेचा उमेदवार उभा राहिला नव्हत़ा पदार्पणातच शिवसेनेने प्रस्थापित भाजपला जबर आव्हान दिल़े आदित्य ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री अनंत गीते, सचिव खासदार विनायक राऊत यांच्यासह अनेक दिग्गज रिंगणात उतरल़े शिवसेनेचे उपनेते, आमदार यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून शिवसेनेच्या मागे अधिकाधिक मतदारांना उभे केल़े राज्यमंत्री केसरकर यांनीही चोख कामगिरी बजावली असल्याचे दिसून आल़े शिवसेनेचे पदापर्णातील हे काम संघटनात्मक ताकद दाखवून देणाऱया सामान्य मतदारच नव्हे तर पदवीधर मतदार मंडळींमध्ये शिवसेनेचे वाढते आकर्षण लक्षणीय ठरणारे आह़े या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव जरी झाला असला तरी प्रतिस्पर्धेला दिलेली लढत नक्कीच महत्त्वाची ठरली आह़े

मतदार नोंदणीसारख्या अनेक बारीक कामांकडे लक्ष देणे हा भाजपचा जनसंघापासून हातखंडा असलातरी या निवडणुकीपूर्वी पक्षांतर्गत एकवाक्यता नसल्याने पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या पारंपरिक मतदारांची नोंदणीच योग्य प्रकारे झाली नाह़ी भाजपच्या राज्य व कोकण विभागीय संघटनेची दुबळी निर्णय क्षमता हे त्याचे कारण म्हणावे लागेल़ या विपरीत परिस्थिती आमदार प्रसाद लाड यांच्याकडे या निवडणुकीची धुरा देण्यात आल़ी त्यांनी प्राप्त परिस्थितीत काय करता येईल याचा विचार केला आणि आजपर्यंत जवळ न आलेल्या शिक्षक संघटनांसह अन्य कर्मचारी संघटनांना सोबत घेतल़े  ऍड़ दीपक पटवर्धन यांच्यासारख्या कार्यकर्त्याकडे जबाबदारी देऊन महत्त्वाची चाल खेळल़ी शिवसेनेचे मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी हालचाली केल्या आणि त्यात यशस्वी झाल़े प्रसाद लाड यांची राजकारणातील खेळी कशी असते त्याचा अंदाज यानिमित्ताने विरोधकांना आल़ा

सुकांत चक्रदेव