|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा

येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबई, नागपूरसह राज्याभरात अनेक भागांत शनिवारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आजही सकाळपासून दक्षिण मुंबई, पूर्व व पश्चिम उपनगरांत जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत.

जोरदार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. येत्या 24 तासांसाठी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिह्यात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. शनिवारी देखील पावसाने मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला. मुसळधार पावसामुळे ठाणे, रायगड, पालघर जिह्यांत पूरस्थिती निर्माण झाली. येथील सर्व नद्या दुथडी भरून वाहत होत्या. तर रायगड, पालघर, ठाणे, औरंगाबाद, सातारा, नांदेड या जिह्यांना पावसाने झोडपले आहे.