|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे माऊंट कुन गिर्यारोहण मोहीम

मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे माऊंट कुन गिर्यारोहण मोहीम 

जलाशय भरल्याने बेळगाववासियांची पाण्याची चिंता मिटली

प्रतिनिधी/ बेळगाव

मराठा लाईट इन्फंट्री यंदा 250 वर्षे पूर्ण करत आहे. इन्फंट्रीच्या वैभवशाली परंपरेच्या स्मृती जागविण्यासाठी इन्फंट्रीने माऊंट कुन गिर्यारोहण मोहीम हाती घेतली आहे. 23 हजार 218 फूट उंचीवर असलेल्या कारगील जवळील या शिखरावर गिर्यारोहक चढून जाणार आहेत.

या मोहिमेचा शुभारंभ दि. 17 जुलै रोजी लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी, (जनरल ऑफीसर कमांडिंग इन चिफ, सदर्न कमांड), लेफ्टनंट जनरल मनोज पांडे, ब्रिगेडिअर गोविंद कलवाड यांच्या उपस्थितीत पुणे येथे झाला. या मोहिमेचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल योगेश धुमाळ करत असून त्यांना प्रतिकात्मक असे बर्फाचे शस्त्र देण्यात आले. या मोहिमेत 30 जवान व तीन अधिकारी, तीन कनिष्ट अधिकारी आहेत.

सोनमर्ग येथे या पथकाला प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर सदर पथक मोहिमेचा शुभारंभ करेल. कुन शिखर सर करणे हे मोठे आव्हान असून जसे जसे वर जाल तसे तसे प्राणवायूची कमतरता भासते. येथे सतत अनिश्चित हवामान असते. मात्र जवानांनी हे आव्हान स्वीकारले असून आजपर्यंत देशासाठी ज्यांनी ज्यांनी प्राणांची बाजी लावली त्यांच्या बद्दलची कृतज्ञता म्हणून तसेच छत्रपती शिवरायांच्या त्यागाचे स्मरण म्हणून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

Related posts: