|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » क्रिडा » जोहाना कोंटाची केनिनवर मात

जोहाना कोंटाची केनिनवर मात 

वृत्तसंस्था /सॅन जोस :

येथे सुरू असलेल्या सिलीकॉन व्हॅली क्लासिक महिलांच्या टेनिस स्पर्धेत  ब्रिटनच्या जोहाना कोंटाने सोफिया केनिनवर 6-1, 6-4 असा विजय मिळवित पुढील फेरीत प्रवेश मिळविला. दोन वर्षापूर्वी कोंटाने या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते.

बुधवारी झालेल्या सामन्यात कोंटाने केनिनचा 6-1, 6-4 असा फडशा पाडला. कोंटाने या स्पर्धेत अमेरिकेच्या माजी टॉप सीडेड सेरेना विलीयम्सला पराभवाचा धक्का दिला होता. केंटाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना मर्टेन्सबरोबर होणार आहे. मर्टेन्सने अमेरिकेच्या क्रेझरवर 6-2, 6-0 अशी मात केली. स्पेनच्या मुगुरूझाने या स्पर्धेत दुसऱया फेरीतच माघार घेतली. बेलारूसच्या अझारेंकाने ब्लिनकोव्हाचा 6-1, 6-0 तसेच कॉलीन्सने लॅफ्कोचा 6-1, 3-6, 6-1 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.