|Friday, March 22, 2019
You are here: Home » Top News » शाळेतील औषधातून विषबाधा, एकाचा मृत्यू तर 76 विद्यार्थी रूग्णालयात

शाळेतील औषधातून विषबाधा, एकाचा मृत्यू तर 76 विद्यार्थी रूग्णालयात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

शाळेत दिल्या जाणाऱया औषधातून विषबाधा झाल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. चांदणी साहिल शेख असं या 12 वषीय दुर्दैवी विद्यार्थिनीचं नाव आहे. तर 76 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मुंबईतल्या गोवंडीतील महापालिकेच्या शाळेत हा प्रकार घडला.

 

संजय नगरमधील उर्दू माध्यमाच्या पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना औषधे दिली होती. या औषधातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या विषबाधेमुळे चांदणी शेखचा मृत्यू झाला, तर अन्य विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना कॅल्शयिम, रक्तवाढीची औषधं दिली जात होती. मात्र या औषधांनी विद्यार्थ्यांना उलट्या, जळजळ होऊ लागली. विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व प्रकारामुळे गोवंडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

Related posts: