|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » मनोरंजन » लक्ष्मी सदैव मंगलममधील हरहुन्नरी लक्ष्मी

लक्ष्मी सदैव मंगलममधील हरहुन्नरी लक्ष्मी 

कलर्स मराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमधील लक्ष्मीची भूमिका साकारणारी समफद्धी केळकर हरहुन्नरी आहे. मालिकेमधील तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. अभिनयाबरोबरच समफद्धीला नफत्याची देखील आवड आहे. म्हणूनच समफद्धी लहानपणापासून कथ्थकचे शिक्षण घेत आहे. ठाण्यामधील नुपूर नफत्यालयच्या संचालिका नफत्यालंकार निवेदिता रानडे यांच्याकडून नफत्याचे धडे तिने गिरवले. यावर्षी समफद्धी विशारद पूर्णच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली. सध्या समफद्धी शुटींग सांभाळून तिची ही आवड देखील उत्तमरित्या जोपासत आहे. कथ्थक बरोबरच समफद्धी लावणी, हिप हॉप, बॉलीवूड, वेस्टर्न याप्रकारचे नफत्य देखील लीना भोसले शेलार यांच्याकडून शिकत आहे, यांचे क्लास देखील ठाण्यामध्ये आहेत.

यावर बोलताना समफद्धी म्हणाली, माझी नफत्याची आवड बघून आईने मला लहानपणीच कथ्थक शिकण्यासाठी निवेदिता रानडे यांचे क्लासेस सुरू केले. गेल्या 13-14 वर्षांपासून किंबहुना त्याहून जास्त वर्षांपासून मी कथ्थक शिकत आहे. मी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातर्पे कथ्थकच्या परीक्षा देत होते. यावर्षी मी विशारद पूर्ण झाले ते पण विशेष प्राविण्य श्रेणीत याचा मला आनंद आहे. कथ्थकच्या परीक्षा खूप कठीण असतात. जवळपास सहा तास या परीक्षा सुरू असतात. कथ्थक शिकण्याचा उपयोग आज मला ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ या मालिकेमध्ये अभिनय करताना देखील होत आहे, असे समृद्धी म्हणते.