|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचा प्रयत्न

मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचा प्रयत्न 

रत्नागिरी तहसील कार्यालयासमोरील प्रकार

वार्ताहर/गणपतीपुळे

भगवतीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते राजाराम गोपाळ घाग (85) यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी तहसीलदार कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. सकाळी 11.30 वा. च्या सुमारास विष पिण्याचा प्रयत्न करत असताना पोलीसांनी त्यांना रोखले. आरक्षणासाठी राज्यभर तीव्र आंदोलन होत असताना रत्नागिरीत प्रथमच घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर मोर्चे, आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाने आक्रमक स्वरूप घेतले असून अनेक ठिकाणी आरक्षणासाठी प्राणार्पंण करण्याचे प्रकार घडत आहेत. राज्यभरात आक्रमक व हिंसक आंदोलन होत असतानाही रत्नागिरीकरांनी आतापर्यंत प्रचंड संयमाने आंदोलन केले आहे.

मात्र सोमवारी घाग यांच्यासारख्या एका ज्येष्ठ नागरिकाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षणाबाबत तीव्र भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याची चर्चा आहे.