|Thursday, July 18, 2019
You are here: Home » क्रिडा » महिला कबड्डीतही भारताला इराणी दणका

महिला कबड्डीतही भारताला इराणी दणका 

अंतिम लढतीत 27-24 फरकाने पराभूत, रौप्यपदकावर समाधान

वृत्तसंस्था/ जकार्ता

सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक नोंदवण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय महिला संघाला अंतिम लढतीत इराणकडून पराभवाचा सामना करावा लागला. इराणने भारताला 27-24 असे फरकांनी पराभूत करत सुवर्णपदक पटकावले. यामुळे भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. गुरुवारी भारतीय पुरुष संघाला इराणनेच उपांत्य फेरीत पराभवाचा दणका दिला होता. विशेष म्हणजे, आशियाई कबड्डीतील भारतीय पुरुष व महिलांची मक्तेदारी इराणने संपुष्टात आणताना नवा इतिहास रचला.

पुरुषांच्या उपांत्य लढतीत इराणने भारताला पराभूत केले होते. यामुळे इराणविरुद्ध खेळताना भारतीय महिला संघावर चांगलेच दडपण दिसून येत होते. पहिल्या सत्रात भारताने 13-11 अशी अवघी दोन गुणांची आघाडी घेतली होती. अर्थात, इराणने शेवटच्या दोन मिनिटांत 13-8 अशा पिछाडीवरुन 13-11 अशी आघाडी कमी केली. दुसऱया सत्रात मात्र इराणच्या महिलांनी आक्रमक खेळ केला. भारताच्या सोनाली शिंगटे, साक्षी कुमारी, कविता चौधरी व पायल यांना बाद करत सामन्यावर चांगलीच पकड निर्माण केली होती. शेवटच्या दोन मिनिटांत भारत 24-21 असा पिछाडीवर होता. मात्र, इराणच्या भक्कम बचावापुढे भारतीय संघाला गुण मिळवण्यात अपयश आले. अखेरीस, इराणने हा सामना 227-24 असा जिंकला व जेतेपदाला गवसणी घातली. या विजयानंतर इराणच्या महिला व पुरुष खेळाडूंनी एकच जल्लोष साजरा केला.

विशेष म्हणजे, इराणविरुद्ध अंतिम लढतीत पंचाच्या चुकीच्या निर्णयाचा भारताला चांगलाच फटका बसला. पंचाच्या या चुकांमुळे भारताला तब्बल पाच गुणाचा फटका बसला. पंचाच्या या दोषामुळे भारताला अखेर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सामन्यानंतर दोनवेळ चॅम्पियन असलेल्या भारतीय महिला खेळाडूंना आपले अश्रू अनावर झाले.

बोपण्णा-शरण जोडीचे