|Sunday, November 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मलप्रभाचा सन्मान करण्याचा मनपाला विसर

मलप्रभाचा सन्मान करण्याचा मनपाला विसर 

गौरव सोहळा आयोजनासाठी द्यावे लागले निवेदन

बेळगाव / प्रतिनिधी

नुकत्याच इंडोनेशियामधील जकार्ता येथे पार पडलेल्या 18 व्या अशियाई क्रीडा महासंग्रामात मलप्रभा जाधवने कुराश या क्रीडाप्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे. या क्रीडापटूचा सत्कार विविध खाते व संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे. पण याचा विसर महानगरपालिकेला पडला असल्याने देशाचे नाव उज्ज्वल करणाऱया क्रीडापटूचा सत्कार महापालिकेच्या वतीने करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन माजी महापौर सरिता पाटील यांनी महापौरांना दिले.

जकार्ता येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत 52 किलो गटात कुराश या क्रीडाप्रकारात  अद्वितीय व अविस्मरणीय कामगिरी मलप्रभा जाधव हिने केली आहे. तिच्या या कामगिरीमुळे देशाच्या शिरेत मानाचा तुरा रोवला आहे. देशाबरोबरच बेळगावचे नाव जगाच्या नकाशावर झळकवले आहे. तिने केलेली कामगिरी गौरवास्पद असून बेळगाव शहराच्या वतीने तिचा सन्मान करणे आवश्यक आहे. बेळगाव शहराचे नावलौकिक करणाऱया क्रीडापटुचा सत्कार सर्वत्र होत आहे. यामध्ये महानगरपालिका मागे पडु नये अशा विनंतीचे निवेदन माजी महापौर सरिता पाटील यांनी दिले. लवकरच महापालिका सभागृहाच्या वतीने मलप्रभा जाधव हिचा सत्कार करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी नगरसेविका माया कडोलकर व रमेश कळसण्णावर उपस्थित होते..

Related posts: