|Saturday, July 20, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » गूगल क्रोमला दहा वर्षे पूर्ण

गूगल क्रोमला दहा वर्षे पूर्ण 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

गूगलचा सर्वात लोकप्रिय ब्राऊजर गूगल क्रोम आज दहा वर्षांचा होत आहे आणि त्यानिमित्त गूगलने बऱयाच वर्षांनंतर आज क्रोमच्या यूजर इंटरफेस डिझाईनमध्ये बदल केला आहे .त्यांच्या प्रसिद्ध मटेरियल डिझाईन आधरीत पर्याय आता क्रोमवर उपलब्ध असणार आहे. 2 सप्टेंबर 2008 रोजी क्रोम ब्राऊजर विंडोज एक्सपीसाठी प्रथम उपलब्ध झाला होता.

काही वर्षांपूर्वी अगदी तळाशी असलेला गूगलचा हा ब्राऊजर त्या काळच्या सर्वांना मागे टाकत सध्या जगातला सर्वात जास्त वापरला जाणारा ब्राऊजर आहे. इंटरनेट एक्सप्लोरर, फायरफॉक्स, सफारी, ऑपेरा, एज या सर्वांना एकत्रित जरी धरले तरीही क्रोमच्या एकूण वापरकर्त्यांच्या संख्येपेक्षा कमीच वापरकर्ते आहेत. डेस्कटॉप कॉम्पुटर्सवर 65… आणि फोन्सवर 60… हिस्सा आज एकटय़ा क्रोम ब्राऊजरकडे आहे.