|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » दि वाई अर्बन बँकेच्यावतीने सतीशराव मराठेंचा गौरव

दि वाई अर्बन बँकेच्यावतीने सतीशराव मराठेंचा गौरव 

प्रतिनिधी /वाई :

भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक म्हणून सहकार क्षेत्रातील अनुभवी व अभ्यासू नेते सतीशराव मराठे यांची निवड झाल्याबद्दल दि वाई अर्बन को. ऑप. बँकेच्यावतीने पुणे येथे नुकताच त्यांचा गौरव करण्यात आला. दि वाई अर्बन को. ऑप. बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत वामनराव तथा सी. व्ही. काळे, यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन श्री. मराठे यांना सन्मानित करण्यात आले. 

 सहकार भारतीचे राष्ट्रीय संरक्षक व सहकार, बँकिंग क्षेत्रातील तज्ञ असलेल्या सतीशराव मराठे यांची केंद्र शासनाने नुकतीच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळात त्यांची नुकतीच निवड केली आहे. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना दि वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष सीए. सी. व्ही. काळे म्हणाले, मराठे सरांच्या निवडीमुळे सहकारी बँकींग क्षेत्राचा गौरव झाला आहे. सरांचा सातारा जिह्याशी जवळचा संबंध आहे. त्यांना विविध नागरी सहकारी बँकांमधील सर्व प्रकारच्या अडीअडचणी व बँकांच्या कामकाजाचा दिर्घ अनुभव आहे. आगामी काळात मराठे सरांच्या माध्यमांतून नागरी सहकारी बँकांचे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत. त्यांच्या प्रदिर्घ अनुभव व अभ्यासाच्या माध्यमांतून रिझर्व्ह बँकेलाही निश्चितच नवी दिशा मिळेल.  

 श्री. मराठे यांचा गौरव कार्यक्रमप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष नामदार शेखर चरेगावकर, बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी, संचालक मदनलाल ओसवाल, ऍड. प्रतापराव शिंदे, प्रा. विष्णू खरे, सीए. किशोरकुमार मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, किसन वीर साखर उद्योगाचे संचालक प्रवीण जगताप आदी व मान्यवर उपस्थित होते.