|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » स्वीकृतवरून भाजपात नाराजी नाही

स्वीकृतवरून भाजपात नाराजी नाही 

प्रतिनिधी/ सांगली

स्वीकृतसाठी अनेक इच्छूक आहेत. मात्र वरून भाजपात कोणतीही नाराजी नाही, गटबाजीही नाही, भाजपा मनपात एकसंघपणे आगामी पाच वर्षे काम करणार असल्याचा दावा भाजपाचे शहर जिल्हध्यक्ष शेखर इनामदार यांनी पत्रकार बैठकीत केला. स्वीकृतच्या नावावर आमदार, खासदार आणि महसुल मंत्री चंद्रकांत पाटील हेच निर्णय घेणार असुन याबाबत रविवारी पक्षाची बैठक होणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

मनपातील स्वीकृत सदस्य निवडीवरून भाजपात नाराजी असल्याचे वृत प्रसिध्द झाल्यानंतर शहराध्यक्ष शेखर इनामदार यांनी शुक्रवारी पत्रकार बैठक घेवून याचा खुलासा केला. यावेळी महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सुर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर, नगरसेवक निरंजन अवटी, संदीप अवटी, प्रकाश ढंग, राजेंद्र कुंभार आदी नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी बोलताना शेखर इनामदार म्हणाले, महापालिकेच्या इतिहासामध्ये प्रथमच भाजपाची सत्ता आली आहे. यामुळे नेते, नगरसेवकांमध्ये मोठा उत्साह आहे. आमदार, खासदार आणि महसुल मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर, उपमहापौर, गटनेते आणि नगरसेवक उत्साहाने कामाला लागले आहे. स्वीकृतसाठी 22 हुन अधिक इच्छूक असून प्रत्येकांनी नेते, गटनेते यांच्याकडे अर्ज दिले आहेत. ही सर्व नावे, रविवारी पार्टी मिटींग घेवून स्थानिक नेतृत्वाकडून महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठविली जातील. त्यांच्याकडून तीन नावे फाईनल केली जातील. असे सांगून ते म्हणाले, स्वीकृतसाठी इच्छकांची संख्या अधिक असल्याने स्पर्धा आहे मात्र कोणताही संघर्ष अथवा गटबाजी नाही, अथवा यावरून कोणी नाराजही नाही. भाजपा एकसंघपणे पक्षाचा आदेश अंतिम मानुन मनपात आगामी पाच वर्षे जनतेची कामे करणार आहे.

महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आगामी कोणतीही निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केली असून याबाबत बोलताना ते म्हणाले, त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते असा निर्णय घेणार नाहीत, तसा निर्णय भाजपा मान्य करणार नाही असेही यावेळी शेखर इनामदार यांनी स्पष्ट केले.

भाजपा एकच गट

यावेळी उपमहापौर धीरज सुर्यवंशी म्हणाले, आपण नाराज नाही, शिवाय उपमहापौर यांचाही कोणताही गट नाही, फक्त भाजपा हा एकच गट असून मनपा क्षेत्राच्या विकासासाठी एकसंघपणे काम केले जाईल. नाराज असल्याचे वृत चुकीचे आहे.

Related posts: