|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » भाजपच्या दिखावू धोरणांचे देखावे करा

भाजपच्या दिखावू धोरणांचे देखावे करा 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

   अच्छे दिनची घोषणा करत भाजप केंद्रात व राज्यात सत्तेवर आले. मात्र सत्तेवर आल्यानंतर भाजपची धोरणे ही केवळ घोषणांपूरतीच असल्याचे दिसून आले आहे. भाजपच्या या दिखावू धोरणांचे देखावे यंदाच्या गणेशोत्सवमाध्ये कोल्हापूरच्या तरूण मंडळांनी करावे असे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी केले. पूर्वी ब्रिटीश व अंधश्रद्धेविषयी जनजागृती करावी लागत होती. आता भाजप सरकारविरोधात जनजागृती करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत हसन मुश्रीफ फौंडेशनच्या गणराया अवॉर्ड 2017 चे वितरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी शाहू स्मारक भवन येथे संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील प्रमुख उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आलेला गणराया अवॉर्ड हा उपक्रम इतर जिह्यांमध्येही सुरू करावा. भाजप सरकारने यंदा दिखाव्यासाठी अनेक सिन उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये पेट्रोल दरवाढ, रूपयाचे अवमूल्यन, वाहन धारकांचा त्रास, भाजप नेत्यांची महिलांबाबतची वक्तव्ये, विजय मल्ल्या, निरव मोदी, चोक्सी यांचे पलायन यावर यंदा सिन होवू शकतात असा चिमटाही पाटील यांनी काढला. सरकारच्या या धोरणांविरोधात जनजागरण करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

  राष्ट्रवादी पक्ष शहरामध्ये रूजावा यासाठीच हा उपक्रम सुरू केल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले. गणेशोत्सवामधूनच कार्यकर्ता घडत असतो. गणेशोत्सव कार्यकर्ता तयार करण्याची शाळा आहे. यातून अनेक नगरसेवक राष्ट्रवादी पक्षाला मिळाले असून यामुळेच पक्षाने महानगरपालीकेवर 15 वर्षे सत्ता राखली असल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

 कार्यक्रमाचे स्वागत हसन मुश्रीफ फौंडेशनचे अध्यक्ष सुनिल महाडेश्वर यांनी केले. तर प्रास्ताविक माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले. महापौर शोभा बोंद्रे, इलियास नायकवडी, पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शहराध्यक्ष आर. के. पवार, माजी खासदार निवेदीता माने, शिवसेनेचे नगरसेवक राहूल चव्हाण, सांगलीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान, बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर, संगीता खाडे, यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होत

सजिव देखावा स्पर्धा

प्रथम क्रमांक भारतवीर मित्र मंडळ, कसबा बावडा, विशेष पुरस्कार छत्रपती शिवाजीराजे तरूण मंडळ, कसबा बावडा, उमेश कांदेकर युवा मंच रंकाळा टॉवर, उत्तेजनार्थ विश्वशांती मित्र मंडळ

तांत्रिक देखावा स्पर्धा

प्रथम क्रमांक श्री गजलक्ष्मी ग्रुप, शाहू गल्ली व डांगे गल्ली तरूण मंडळ, बुधवार पेठ यांच्यामध्ये विभागून देण्यात आला. खासबाग येथील प्रिन्स क्लब मंडळास विशेष पुरस्कार देण्यगात आला, तर जुना बुधवार पेठ येथील शिपुगडे तालमीस उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला.

उत्कृष्ठ गणेशमुर्ती

उद्योगराजा तरूण मंडळ, जय पद्मावती मंडळ, अष्टविनायक ग्रुप, राधाकृष्ण भक्त मंडळ, कलकल तरूण मंडळ, श्री म्हसोबा तरूण मंडळ, पी बॉईज, च्याव म्यॉव ग्रुप, न्यु उद्यमनगर प्रेंड्स सर्कल, विश्वकर्मा हौसिंग सोसायटी, सुपर स्टार मित्र मंडळ, अष्टविनायक तरूण मंडळ, जय विजय मित्र मंडळ, न्यू शिवनेरी मित्र मंडळ, जय शिवराय फूट प्लेअर तरूण मंडळ, ओम मित्र मंडळ, श्री ऋणमुक्तेश्वर तरूण मंडळ, संतोष गायकवाड प्रेमी, वीर बाजीप्रभू तरूण मंडळ, संरक्षण तरूण मंडळ, श्री एकदंती गणेश मित्र मंडळ

Related posts: