|Sunday, November 18, 2018
You are here: Home » Top News » काश्मीरमध्ये 360 दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरमध्ये 360 दहशतवाद्यांचा खात्मा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतीय लष्कराने राबवलेल्या आक्रमक मोहिमांमुळे काश्मीर खोऱयात दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याचे काम सुरू आहे. लष्कराच्या आक्रमक पवित्र्यामुळे खोऱयातील दहशतवाद्यांचे आयुर्मान घटले आहे. मागील दोन वर्षांत सुमारे 360 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सीआरपीएफचे डायरेक्टर जनरल राजीव राज भटनागर यांनी ही माहिती दिली आहे.

काश्मीर खोऱयातील तरुणांचे दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होण्याचे प्रमाण हे चिंतेचा विषय आहे का, असे विचारले असता उत्तरदाखल भटनागर म्हणाले की, दहशतवादी संघटनांमध्ये भरती होणाऱया तरुणांचे वय कमी आहे. मात्र ते फार काळ जगू शकत नाहीत. त्यांची संख्या जास्त असू शकते पण त्यांचा परिणाम मर्यादित आहे. काश्मीर खोऱयात दहशतवादी संघटनांध्ये भरती होणाऱया तरुणांची संख्या वाढली आहे. मात्र सुरक्षा दलांकडून अशा तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांमध्ये काही बाहेरच्या दहशतवाद्यांचा तर काही स्थानिक तरुणांचा समावेश आहे. राज्यातील सीआरपीएफचे जवान, राज्य पोलीस आणि लष्कर एकमेकांशी ताळमेळ ठेवून काश्मीरमध्ये काम करत असल्याचेही भटनागर यांनी सांगितले. आम्ही एक युनिट म्हणून काम करत आहोत. त्यामुळे आम्हाला चांगले यश मिळत आहे. यावषी आतापर्यंत 142 दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे. तर मागील वषी 220 दहशतवादी मारले गेले होते. असे ते म्हणाले. काश्मीरमध्ये तैनात जवानांच्या सुरक्षेसाठी फूल बॉडी प्रोटेक्टर, बुलेट प्रूफ गाड्या आणि विशेष चिलखती वाहने तैनात करून जवानांच्या सुरक्षेचा स्तर वाढवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Related posts: