|Thursday, February 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपच जिंकणार

लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपच जिंकणार 

आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांचा दावा

प्रतिनिधी/ पणजी

लोकसभेच्या गोव्यातील दोन्ही जागा भाजपच सहजपणे जिंकणार असल्याचा दावा केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी करून गोव्याचा मुख्यमंत्री बदलण्याची गरज नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

आल्तिनो-पणजी येथील एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना श्री. नाईक म्हणाले की, अमेरिकेतून परतल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काम सुरू केले असून ते चांगल्या पद्धतीने कारभार हाताळीत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपद दुसऱयाकडे देण्याची आवश्यकता नाही व ते बदलू नये, असेही त्यांनी सांगितले.

Related posts: