|Saturday, April 20, 2019
You are here: Home » क्रिडा » नीरज, मीराबाई, बजरंग यांची खेलरत्नसाठी शिफारस

नीरज, मीराबाई, बजरंग यांची खेलरत्नसाठी शिफारस 

25 सप्टेंबर रोजी होणार वितरण सोहळा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भालाफेकपटू नीरज चोप्रा व वर्ल्ड चॅम्पियन महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णविजेता मल्ल बजरंग पुनिया यांचे यावषीच्या राजीव गांधी खेलरत्न पुरुस्कारांसाठी नामांकन झाले आहे.

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने खेलरत्न व अर्जुन पुरस्कारांसाठी खेळाडूंची शिफारस करण्याकरिता एक समिती स्थापन केली आहे. तसेच द्रोणाचार्य व ध्यानचंद पुरस्कार निवडीसाठीही समिती नेमली आहे. यावषी पुरस्कार वितरण सोहळा 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती भवनात होणार आहे. दरवषी सदर पुरस्कार 29 ऑगस्ट या राष्ट्रीय क्रीडादिनी देण्याची प्रथा आहे. पण यावषी त्याच सुमारास जकार्ता-पालेमबंग येथे आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्याने हा सोहळा लांबणीवर टाकून 25 सप्टेंबर रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेतला गेला. यावेळी क्रीडा मंत्रालयाने खेलरत्न व अर्जुन पुरस्कारासाठी धोरणात बदल केला असून गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांचीही शिफारस होणार असून त्यांनाही हे पुरस्कार जिंकण्याची संधी मिळणार आहे.

खेलरत्न व अर्जुन पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश इंदरमीत कौल कोच्चर असून माजी क्रीडापटू अश्विनी नाचप्पा, कमलेश मेहता, समरेश जंग, विमल कुमार हेही या समितीतील सदस्य आहेत. द्रोणाचार्य व ध्यानचंद पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी पंजाब व हरियाणा उच्च न्यायालाचे निवृत्त न्यायाधीश मुकुल मुदगल असून एकूण 11 सदस्यांची ही समिती आहे.

Related posts: