|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » एका दिवसाच्या सुट्टीनंतर पेट्रोल डिझेलची दरवाढ

एका दिवसाच्या सुट्टीनंतर पेट्रोल डिझेलची दरवाढ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत अधिकच वाढ होत आहे. सतत वाढत चाललेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनी अनेक ठिकाणी नव्वदी गाठली असताना बुधवारी (19 सप्टेंबर) हे दर वाढलेच नाहीत. मात्र आता एका दिवसाच्या सुट्टीनंतर पेट्रोलची दरवाढ सुरुच आहे. मुंबईत गुरुवारी (20 सप्टेंबर) पेट्रोल 6 पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रति लिटर दर 89.60 तर डिझेलचा प्रति लिटर दर 78.42 झाला आहे. ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागत आहे. राजधनी दिल्लीत पेट्रोल 6 पैशांनी प्रति लिटरमागे महाग झाले आहे. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एक लिटरमागे 82.22 रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर 73.87 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे.