|Thursday, June 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ट्रम्प यांचे फोनवरील संभाषण ऐकतो चीन

ट्रम्प यांचे फोनवरील संभाषण ऐकतो चीन 

वॉशिंग्टन :

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फोनवरून मित्रांसोबत होणारे संभाषण रशिया आणि चीन ऐकत असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनीच याबद्दल दावा केला आहे. चीनचे हेर फोनवरून होणारे संभाषण ऐकतात आणि याचा वापर ट्रम्प यांचे कामकाज चांगल्याप्रकारे जाणून घेणे आणि प्रशासनाच्या धोरणांना प्रभावित करण्यासाठी करत असल्याचे अधिकाऱयांनी म्हटले आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील चिघळणारे व्यापारयुद्ध पाहता हे अत्यंत गंभीर प्रकरण मानले जात आहे.

ट्रम्प स्वतःच्या मित्रांसोबत संपर्क साधण्यासाठी आयफोनचा वापर करतात. अधिकाऱयांनी वारंवार सूचना करून देखील ते आयफोनचा वापर थांबविण्यास तयार नाहीत. ट्रम्प यांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लँडलाईन फोनचा वापर करण्यास सांगण्यात आले, पण त्यांनी ही सूचना फेटाळल्याचे अहवालात म्हटले गेले.