|Friday, May 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बारामुल्लातील चकमकीत दोन दहशतवादी ठार

बारामुल्लातील चकमकीत दोन दहशतवादी ठार 

जवान हुतात्मा : सोपोर ऑपरेशन

श्रीनगर :

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्हय़ातील सोपोर भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीदरम्यान दोन दहशतवादी ठार झाले तर एक जवान हुतात्मा झाला. सोपोरच्या ऑपरेशनमध्ये दोन दहशतवादी ठार झाले आहेत, असे श्रीनगरचे संरक्षण प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटविणे आणि त्यांच्या समुहाबद्दल माहिती घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

दहशतवाद्यांच्या घुसखोरीबाबत गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी सकाळी सुरक्षा दलाने उत्तर काश्मीरमधील सोपोर जिल्हय़ातील पजलोपोरा गावात एका विशेष पथकाच्या मदतीने शोधमोहीम हाती घेण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांनी सैन्याच्या शोध पथकावर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचे रुपांतर हल्ल्यात करण्यात आले आहे. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून एक जवान हुतात्मा झाला.

Related posts: