|Thursday, May 23, 2019
You are here: Home » उद्योग » सेन्सेक्स 345 अंकाची घसरण होत बंद , निफ्टी 10,500 खाली

सेन्सेक्स 345 अंकाची घसरण होत बंद , निफ्टी 10,500 खाली 

वृत्तसंस्था / मुंबई 

भारतीय बाजारात नव्या सप्ताहाची सुरुवात विक्रीसोबत झाली. परंतु हे तेजीचे वातावण दुपारनंतर न टिकून राहता बाजारात विक्रीत दबाव वाढत गेला आणि घसरणीची नोंद करण्यात आली.

सेन्सेक्स आणि निफ्टीत 1 टक्क्यांनी कमजोर होत बंद झालेत. सोमवारी निफ्टी 10,464 पर्यत पोहोचत घसरला, तर सेन्सेक्स 34,757 वर घसरला.  बाजाराच्या शेवटच्या क्षणी निफ्टी 100 अंकाहून जादा कमजोर होत बंद झाल. सेन्सेक्स 34,800 टप्पा गाठत बंद झाला.

सोमवारी बाजारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये दबाव दिसून आला, भारतीय शेअर बाजाराचा मिडकॅप निर्देशाक 0.9 टक्क्यांनी घसरत बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात मिडकॅपच्या निर्देशांकात 1 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. भारतीय बाजारात बँकिंग, धातू, औषध, वीज यांच्या समभागात मोठा दबाव राहिला. बँक निफ्टी 0.9 टक्क्यांच्या घसरणीसह 25,540 वर बंद झाला. आयटी शेअर्समध्ये खरेदीचे वातावरण राहिले.

दिग्गज शेअर्समध्ये एचपीसीएल, टाटा मोटर्स, आयओसी, बजाज फायनान्स, हिडाल्को, हीरोमोटो, मारुती सुझुकी, अदानी पोर्ट आणि वेदान्ता या कंपन्यांचे समभाग 6.7 ते 2.6 टक्क्यांनी घसरण होत बंद झालेत. टायटन, टेक महिंद्रा, टाटा स्टील, कोटक महिंद्रा बँक, सिप्ला, इन्फोसिस, आणि टीसीएस या कंपन्यांच्या समभागात 5.6 ते 0.3 टक्क्यांनी वधारत बंद झालेत.

मिडकॅपमध्ये बँक ऑफ इंडीया, यूनियन बँक, कन्टेनर कॉर्प, अदानी पॉवर आणि कॅनरा बँक यांचे समभाग 4.9 ते 3.5 टक्क्यांनी अडखळत बंद झालेत. तर वॉकहार्ट, अल्केम फार्मा, इमामी, कमिन्स यांचे समभाग 9 ते 2.1 टक्क्यांनी उसळी घेत बंद झालेत.

 

Related posts: