|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » साहित्यिक रमेश वेळुसकर यांना ‘संगीतांजली’

साहित्यिक रमेश वेळुसकर यांना ‘संगीतांजली’ 

प्रतिनिधी/ पणजी

साहित्यिक रमेश वेळुसकर हे बहुभाषिक साहित्यिक होते. त्यांना कोकणी, मराठी, पोर्तुगीज, संस्कृत, हिंदी, बंगाली, ऊर्दु यासारख्या भाषा येत होत्या. नवीन भाषा शिकण्याची त्यांचा जिज्ञासा होती. अखिल भारतीय स्तरावरील दृष्टीकोन असलेला एकमेव कोकणी लेख होता असे म्हटल्यास ते चुकीचे ठरु नये. रमेश भगवंत वेळुसकर हे असे साहित्यिक होते ज्यांचे पद्य-गद्यांवर पभुत्व होते असे गौरवोद्गार त्यांचे जीवलग मीत्र दत्ता दामोदर नाईक यांनी काढले.

कला आणि संस्कृती संचालनालय गोवा, सम्राट क्लब पणजी आणि बिम्ब परिवार गोवा आयोजित ‘सावुल गोरी सावुल सांज’ या कार्यक्रमात ते बोलत होते. रमेश वेळुसकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना समर्पीत असा संगीतांजली कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

या संगीताच्या मैफ्ढलीत गायिका शकुंतला भरणे, गायक शिरीष लवंदे यांनी त्याच्या कवितांना सूर दिले तसेच बा. भ. बोरकर यांच्या कवितांचेही सादरीकरण करण्यात आले. त्यांना सचिन थळी, शुभम नाईक, प्रकाश आमोणकर आणि विष्णू यांनी संगीत साथ दिली. त्यांच्या सुंदर कवितांचे गीतोमय सादरीकरण केले असून त्यांना रसिकांची उत्स्फ्tढर्त दाद मिळाली.

रमेश वेळुसकर यांच्या लेखनामध्ये काव्यात्मकला आहे. त्यांनी सरळ साध्या शब्दांचा वापर करून लिहिले आहे. अगदी सामान्य माणसालाही त्यांची कविता समजेल. त्यात एक गुढ अर्थही दडलेला आहे तो अभ्यासकांना समजतो. त्यांच्या कवितांना संगीतमय करण्यासाठी फ्ढारसा त्रास होत नाही कारण त्यांची कविता ही आपणच लय घेऊन येते.खरे तर हेच श्रेष्ठ कविचे वैशिष्टय़ आहे असेही दत्ता नाईक यांनी सांगितले.