|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » उद्योग » सलग सहाव्या दिवशी रूपया बळकट

सलग सहाव्या दिवशी रूपया बळकट 

मुंबई

 मंगळवारी सलग सहाव्या दिवशी रूपयाने डॉलरच्या तुलनेत आपली स्थिती अधिक बळकट केली आहे. दिवसअखेर डॉलरचा दर 71.46 रूपये असा होता. तो सोमवारपेक्षा 21 पैशांनी अधिक मजबूत झाला आहे. विदेशी गुंतवणुकीचा ओघ आता वाढीला लागल्याने रूपयाची मागणी वाढून तो तुलनेने भक्कम होत आहे.

गेल्या सहा दिवसात रूपयाच्या मूल्यात वाढ झाली आहे. त्यामुळे डॉलरची किंमत 1 रूपया 40 पैशांनी कमी झाली. मंगळवारी दिवसभरात एकेवेळी डॉलरची किंमत 71.27 एवढी घसरली होती. तथापि, दिवसअखेर काही प्रमाणात डॉलरची मागणी वाढल्याने त्याचा परिणाम दिसून आला. विशेषतः निर्यातदारांनी डॉलरची विक्री केली.

Related posts: