|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अधिवेशन काळात कडक बंदोबस्त

अधिवेशन काळात कडक बंदोबस्त 

@ प्रतिनिधी/ बेळगाव

कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन बेळगावात होत असताना कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी राज्य पोलीसदल घेत आहे. शेतकऱयांची आंदोलने आणि उद्भवणाऱया समस्या याचा आढावा घेतोय. पूर्णपणे सक्षम व्यवस्था आणि कडक बंदोबस्त ठेवला जाईल, अशी माहिती कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक कमलपंत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

ऊस उत्पादक शेतकऱयांच्या आंदोलनाला वेगवेगळे वळण लागल्यानंतर बेंगळूर येथून अनेक वरि÷ अधिकारी बेळगावला दाखल झाले आहेत.  अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनांची परिस्थिती आणि उद्भवणाऱया समस्यांचा आढावा घेतला जात आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची मुख्य जबाबदारी असणाऱया कमलपंत यांनी पोलीस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा, उपायुक्त सीमा लाटकर, महानिंग नंदगावी, जिल्हा पोलीस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी तसेच इतर अनेक महत्त्वाच्या पोलीस अधिकाऱयांची बैठक केली.

बंदोबस्त चोख राहणार

अधिवेशन काळात आणखी आंदोलने होण्याची शक्मयता असताना त्यामुळे बेळगाव शहर आणि परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी घ्याव्या लागणाऱया खबरदारीचा आढावा घेण्यात आला. याबद्दल बोलताना बंदोबस्त चोख राहणार आहे. संपूर्ण राज्यातून पोलीस फौज मागविण्यात येणार आहे. यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष व इतर महत्त्वाच्या व्यक्तींनी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. यामुळे कोणताही सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असा विश्वास आपल्याला वाटतो, असे त्यांनी सांगितले.

राज्यभरातून मागविल्या जाणाऱया पोलिसांच्या भोजन आणि स्वच्छतागृहांचा प्रश्न याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ही एका वषी होणारी प्रक्रिया नाही. यामुळे अडचणींवर मात करण्यासाठी आम्ही दरवषी सुधारणा करीत आलो आहोत. पोलिसांच्या निवासी व्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मागील वषी कर्नाटक उद्योग विकास मंडळाच्या ऑटोनगर येथील जागेत पोलिसांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळीही ती जागा असेल. याचबरोबरीने कर्नाटक राज्य राखीव दलाच्या जागेत 50 नवीन स्वच्छतागृहे उपलब्ध करण्यावर भर दिला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

आंदोलकांची विशेष काळजी

उत्तर कर्नाटकावर विकासाच्यादृष्टिने अन्याय हा प्रश्न आहेच. याबरोबर ऊस उत्पादक शेतकरी, कष्टकरी, कामगार तसेच विविध मागण्या घेऊन अधिवेशन काळात आंदोलकांची गर्दी होणार आहे. याकडे लक्ष वेधले असता आपल्याला याची कल्पना आहे. अधिवेशनाचे कामकाज सुरळीत चालण्याच्यादृष्टिने आंदोलकांची विशेष काळजी आणि व्यवस्था केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. आंदोलन करण्यासाठी येणाऱयांसाठी स्वतंत्र तंबू उभारण्यात येतील. त्यांची मागणी संबंधित मंत्री किंवा खात्याकडे पाठवून देऊन आवश्यक त्या व्यक्तीला त्या आंदोलनस्थळी पोहोचविण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

मुख्यमंत्री, गृहमंत्री व संबंधित खात्याचे मंत्री आंदोलकांना भेटण्यास जात असताना विशेष बंदोबस्त दिला जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आंदोलक महामार्गावर येऊन वाहतुकीला अडथळा होईल, अशी परिस्थिती उद्भवू नये, याची काळजी घेणार आहे. आंदोलकांचा प्रश्न हा संवेदनशील आहे. यामुळे तो अतिशय काळजीपूर्वक हाताळण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱयांना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Related posts: