|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » तवेराच्या धडकेने शिक्षकाचा मृत्यू

तवेराच्या धडकेने शिक्षकाचा मृत्यू 

महामार्गावर वालोपेतील दुर्घटना

चिपळूण

मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईहून भरधाव वेगाने आलेल्या तवेरा गाडीने मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिक्षक दांपत्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पती जागीच ठार झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे 6 वाजता वालोपे येथे घडली.

  राजेंद्र जानू गमरे (50) असे अपघातात ठार झालेल्या शिक्षकाचे नाव असून  त्यांच्या पत्नी शिक्षिका चित्रा राजेंद्र गमरे (48, दोघेही कळंबस्ते, बौध्दवाडी) असे जखमी शिक्षिकेचे नाव आहे. याप्रकरणी तवेरा चालक विलास वनशा कुराडा (26, डहाणू) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  याबाबत नीलेश सिद्धार्थ गमरे यांनी ा़दिलेल्या फिर्यादीनुसार गमरे दांपत्य हे कळंबस्ते ते रेल्वेफाटा दरम्यान नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले होते. ते वालोपे येथील हॉटेल रिम्स येथे आले असता मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने चाललेल्या विलास कुराडा यांच्या तवेरा गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबदस्त होती की, यात या राजेंद गमरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर चित्रा गमरे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना नजिकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. राजेंद्र गमरे हे केळणे-गोमलेवाडी येथे, तर चित्रा गमरे या दळवटणे-नलावडेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

  या अपघाताची मा†िहती मिळताच घटनास्थळी गर्दी झाली. गमरे यांच्या निधनामुळे कळंबस्ते गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. ते तालुका बौध्दजन †िहतसंरक्षक समितीच्या कळंबस्ते शाखेचे सदस्य तसेच विभाग क्र. 1 चे हिशोब तपासणीस आहेत. त्यांच्यावर सायंकाळी 5 वाजता गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

      गमरेंच्या निधनामुळे पुढे आला स्मशानभूमीचा प्रश्न

  मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात कळंबस्ते स्मशानाचा काही भाग जात असून त्यामुळे स्मशानाची जागा अपुरी पडत आहे. शिक्षक गमरे यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी पुन्हा एकदा कळंबस्ते स्मशानभूमीचा प्रश्न पुढे आला आहे. 2016पासून स्मशानभूमीच्या पर्यायी व्यवस्थेची मागणी होत असतानाही याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष झाले. याप्रकरणी आक्रमक ग्रामस्थांनी गमरे यांचा मृतदेह प्रांत कार्यालयात आणण्याची भूमिका घेतली होती. मात्र प्रकरणी प्रांताधिकारी कल्पना जगताप यांच्या दालनात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱयांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना दिल्या. त्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. यावेळी शौकत मुकादम, सरपंच विवेक महाडिक, माजी सरपंच चंद्रकांत सावंत, सुभाष जाधव, शीलभद्र जाधव, संजय सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.