|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » बहिणीची छेड काढल्याने भांडण, जाब विचारणाऱया विद्यार्थ्याला संपवले

बहिणीची छेड काढल्याने भांडण, जाब विचारणाऱया विद्यार्थ्याला संपवले 

ऑनलाईन टीम / बीड :

बहिणीची छेड काढल्यावरुन झालेल्या भांडणातून जाब विचारणाऱया अल्पवयीन मुलाची मित्रांनीच हत्या केल्याची घटना बीडमध्ये समोर आली. विशेष म्हणजे हत्येनंतर आरोपींनी अपहरणाचा बनाव केला. पण पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या केरुळ गावातला 14 वर्षांचा गणेश आंधळे 12 डिसेंबरला बेपत्ता झाला. गणेशच्या आईने आष्टी पोलिसात याची तक्रारही दिली. दोन दिवसांनी गावातल्याच एका दगडावर एक चिठ्ठी आढळून आली. यामध्ये 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. याच काळात गणेशचा मृतदेहही आढळला. गणेश हा ऊसतोड मजूराचा मुलगा. खंडणीसाठी गणेशचे अपहरण कोण आणि का करेल असा संशय पोलिसांना आला आणि त्यानंतर तपासाची चपे फिरली. गणेशची हत्या केल्याची कबुली त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांनी दिली. दोन्ही आरोपी गणेशच्याच शाळेत शिकत होते. गणेशच्या बहिणीला दोघे आरोपी त्रास देत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यातून तिघांची भांडणं झाली आणि या सख्ख्या भावांनी गणेशचा जीव घेतला.