|Saturday, August 24, 2019
You are here: Home » leadingnews » हनुमानाची जात ठरवणाऱ्या भाजपा नेत्यांवर उद्धव ठाकरेंचा निशाणा

हनुमानाची जात ठरवणाऱ्या भाजपा नेत्यांवर उद्धव ठाकरेंचा निशाणा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सध्या देशात रामभक्त हनुमानाची जाती ठरवण्यावरुन प्रचंड चर्चा रंगली आहे. राजकीय मंडळी आपापल्या परीनं हनुमानाची जात ठरवत असल्याचे दिसत आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 
”भगवान श्रीरामा प्रति निष्ठा आणि भक्ती, त्याग आणि समर्पण हीच हनुमानाची जात. तेव्हा हनुमानाला विविध जातींची लेबले लावून उत्तर प्रदेश विधानसभेत कुणी नवे रामायण लिहीत असेल तर या नव्या रामकथेस आवर घाला. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच सांगितले की, ‘भाजपचे काही लोक अतिरेकी बोलतात. त्यांच्या तोंडात बांबूच घालायला हवा.’ तीन राज्यांतील जनतेने पराभव केला हा बांबू नाही काय? तरीही हनुमानाच्या जातीच्या दाखल्यांनी सुरू झालेले नवे रामायण पुढेही असेच चालू राहील. रामायणातील इतरही सर्व पात्रांनी आपापली जातीची प्रमाणपत्रे तयार ठेवावीत!”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. 

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामभक्त हनुमान दलित आणि वंचित होते, असा शोध लावला होता. “बजरंगबली असे लोकदैवत आहेत जे वनवासी, दलित आणि वंचित आहेत”, असे विधान त्यांनी केले होते.