|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » पुणतांबा आंदोलन : चौघांना दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुणतांबा आंदोलन : चौघांना दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी 

ऑनलाईन टीम / पुणतांबा :

येथील कृषीकन्यांनी पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे. मात्र या मुलींना उपचारासाठी दाखल करताना प्रशासनाला विरोध करणाऱयांना 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पुणतांबा अन्नत्याग आंदोलनातील आंदोलनकर्त्यां मुलींची तब्येत खालावल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यास पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी आले होते. यावेळी त्यांना विरोध करणाऱया धनंजय जाधव, प्रताप वहाडणे, हेमंत कुलकर्णी आणि अन्य एकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या चौघांना राहाता कोर्टात होते. कोर्टाने या चौघांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.