|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ..अखेर स्थायी सभेचा मुहूर्त ठरला

..अखेर स्थायी सभेचा मुहूर्त ठरला 

प्रतिनिधी/ सातारा

स्थायी समितीचा अजेंडा तयार करण्याचे काम तब्बल दीड ते दोन महिने सुरु आहे. सर्वसाधारणसभेत यावर नविआचे नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी
प्रखरपणे आपले मत व्यक्त करत, जर आपण स्थायी समितीच्या अजेंडय़ावरील 320 विषय मंजूर केले तर साताऱयाचा कायापालट होईल, असे निक्षून सांगितले होते. त्यानंतरही विषयपत्रिकेवरील विषयांची यादी वाढता-वाढत गेली ते 469 पर्यंत येवू घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वसामान्यांच्या हिताचेही विषय नगरसेवकांनी सूचित केले होते, परंतु तब्बल चार ते पाच ठिकाणी विषयांची गाळण लागत अखेर शुक्रवारी सायंकाळी उशिरा अजेंडय़ावर स्वाक्षरी झाली. 205 विषयांकरिता मंगळवारी वादळी सभा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 विषय समित्यांच्या निवडी झाल्यानंतर पालिका प्रशासन कामाला लागले ते स्थायी समितीचा अजेंडा तयार करण्यात. स्थायी समितीचा अजेंडा सर्वसाधारण सभेपर्यंत 320 विषयांपर्यंत पोहोचला. त्यामुळेच नविआचे बाळासाहेब खंदारे यांनी सभागृहात स्थायी समितीच्या सभेत हे जर विषय मंजूर केले, तर किमान एक वर्षभर सभा घ्यावी लागणार नाही. लोकांची कामे होतील. साताऱयाचा कायापालट होईल, असे निक्षून सभागृहात सांगितले होते. परंतु त्यांनी सांगितल्याच्या उलटेच झाले. अगदी परवापर्यंत स्थायीच्या अजेंडय़ावरील विषयांची संख्या 469 पर्यंत पोहोचली होती. सातारा विकास आघाडी, नगरविकास आघाडी, भाजपा अशा सर्वच नगरसेवकांचे विषय घेण्यात आले होते. त्या अजेंडय़ाची तीन ते चार ठिकाणी चाळणी होवून विषय कोणता घ्यायचा, कोणता ठेवायाचा यावर पेनने मार्किंग, पेन्सिनले आणि स्केचपेनने मार्किंग करण्यात आले. त्या मार्किंगचे कोडे शेवटी शुक्रवारी सायंकाळी उलगडले गेले. नगराध्यक्षा माधवी कदम यांनी अजेंडय़ावर सही केली अन् तारीख ठरली मंगळवारची, परंतु अजेंडय़ावरील विषयांची संख्या निम्म्याहून घडल्याची बाब नगरसेवकांच्या निदर्शनास आली. त्यामुळे नगरसेवकांमध्येही नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

सर्वसामान्यांचे विषय का घेतले नाहीत?

निवडणूक जवळ आली आहे. सातारकर ज्या नेत्यांवर विश्वास ठेवतात. ते आपला विकास करतील. त्यांचीच कामे घेतली नाहीत. विषय सर्वसामान्यांचे होते. आचारसंहितेपूर्वी जर विषय घेतले असते, तर लोकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असती. व्यक्तीद्वेषातून हे विषय टाळले गेले आहेत.