|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News » तीन जागा द्या अन्यथा 15 ठिकाणी उमेदवारी उभे करू : राजू शेट्टी

तीन जागा द्या अन्यथा 15 ठिकाणी उमेदवारी उभे करू : राजू शेट्टी 

ऑनलाईन टीम / पुणे :

आघाडीकडून अद्याप कोणताही प्रकारच्या जागा वाटपाची तयारी नाही, आघाडीने आम्हाला 3 जागा सोडाव्यात अन्यथा राज्यात 15 ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे निवडणुका लढण्यास सज्ज आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला दिला.

 

पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी 3 जागा सोडाव्यात, यामध्ये बुलडाणा येथील राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागा तर वर्धा येथील काँग्रेस कोट्यातील जागा सोडण्यात यावी. तर हातकंणगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आही. जी जागा आमचीच आहे ती देण्याचा प्रश्नच नाही असे शेट्टी यांनी सांगितले.

 

हातकंणगले मतदारसंघातून सदाभाऊ खोत यांनी शेट्टीविरोधात निवडणूक लढण्याची तयारी केली आहे त्यावर बोलताना शेट्टी म्हणाले की, शेतकऱयांच्या बाजूने लढताना अनेक वेळा मी आंदोलने केली, शेतकरी न्याय हक्कांसाठी आवाज उठवतो म्हणून मोदी, फडणवीस यांच्यासह अनेक सत्ताधारी माझ्यावर नाराज आहेत मात्र लढाई मी लढणार आहे त्यामुळे माझ्यासमोर कोणीही निवडणूक लढवली तरी हरकत नाही, मी हातकंणगले मतदारसंघातून पुन्हा निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

Related posts: