|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कुमार बोस यांनी घडवले बनारस घराण्याच्या खुल्या बाजाचे दर्शन

कुमार बोस यांनी घडवले बनारस घराण्याच्या खुल्या बाजाचे दर्शन 

आनंद पर्वच्या वतीने लय, नाद, चिंतन या मैफीलीचे आयोजन 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

घरंदाज परंपरेची शिस्त, ‘बाया’ व ‘दाहिना’ यांचे संतुलित असे वजन, स्वच्छ व स्पष्ट बोल वादनातील गोडवा आणि संयमता यांचा अपूर्व मिलाफ साधत बनारस घराण्याच्या खुल्या बाजाचे सुश्राव्य दर्शन कोलकत्याच्या पंडीत कुमार बोस यांनी घडविले. कोल्हापुरकरांसाठी हा योग प्रथमच ‘आनंद पर्व’च्या वतीने लय नाद चिंतन या मैफीलीच्या रूपाने जुळवून आणला.

पंडीत कुमार बोस यांनी तीन तालामध्ये विविध आकृतीबंध किंवा तबल्यातील मुक्त बंदिश ,पेशकार विविध जातींचे कायदे, रेले,  पदल व निकास, चक्रधार, गती तुकडे , बेदम, तिहाया, घुमारे, लवंगी सादर करीत संगीतप्रेमींची मने जिंकली. या मैफलीला मिलींद कुलकर्णी यांनी हार्मोनियमची साथ दिली. कार्यक्रमाच्या पुर्वाधात जयपूर घराण्याच्या युवा पिढीचे प्रतिनिधीत्व करणाऱया ऋतुजा लाल यांचे रागदारी गायन झाले. ऋतुजा यांनी जयपूर घराण्याची खासीयत असणाऱया ललिता गौरी रागामध्ये विलंबित झपतालामध्ये निबध्द असलेल्य़ा खेलन आयी या बंदीशीचे सादरीकरण केले. आवाजाचा आकारयुक्त लगाव , राग मांडणीतील शिस्तबध्दता आकर्षक बोल, चपळ व गुंतागुंतीची तानक्रिया ही जयपूर घराण्याची गाणवैशिष्टय़े जपत ऋतुजा यांनी राग, ललित गौरी पूर्ण केला. ऋतुजा यांना तबल्याची साथ सिध्देश कुंटे यांनी तर हार्मोनियमची साथ मिलींद कुलकर्णी यांनी दिली. प्रास्ताविक ऐश्वर्या ढेरे यांनी केले.

 

Related posts: