|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शाह फैसल यांच्या नव्या पक्षाची घोषणा आज

शाह फैसल यांच्या नव्या पक्षाची घोषणा आज 

श्रीनगर :

भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनामा देत राजकारणात प्रवेश करणारे शाह फैसल रविवारी नव्या राजकीय पक्षाची स्थापना करणार आहेत. जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंट असे या पक्षाचे नाव असेल. पक्षाच्या शुभारंभासाठी शाह यांनी श्रीनगरच्या राजबाग भागातील फुटबॉल मैदानात कार्यक्रम आयोजित केला आहे. शाह फैसल एखाद्या पक्षात सामील होतील अशी चर्चा होती, परंतु त्यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केल्याने काश्मीर खोऱयातील प्रस्थापित राजकीय पक्षांचा हिरमोड झाला आहे. नोकरीचा राजीनामा दिल्यापासून फैसल जम्मू-काश्मीरमध्ये ठिकठिकाणी लोकांशी संवाद साधत होते. राज्यात भ्रष्टाचामुक्त, स्वच्छ आणि पारदर्शक राजकारणाला समर्थन देण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले होते.

स्वतःच्या राजकीय मोहिमेकरता त्यांनी क्राउडफंडिंगचा मार्ग स्वीकारला आहे. अनेक तरुण-तरुणींना सोबत घेत फैसल पक्ष स्थापन करणार आहेत.

Related posts: