|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » न्यूझीलंड करणार बंदूक कायद्यात बदल

न्यूझीलंड करणार बंदूक कायद्यात बदल 

मशीद गोळीबार : हल्लेखोरावर हत्येचा आरोप : 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

वृत्तसंस्था / ख्राईस्टचर्च

न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च शहरात दोन मशिदींवर हल्ला करून बेछूट गोळीबार करणाऱया 28 वषीय ब्रेंटन टेरंट याला स्थानिक न्यायालयाने 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यावर हत्यांचा आरोप ठेवण्यात आला असून आता त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जात आहे. त्याने केलेल्या हल्ल्यात 49 नागरिक ठार झाले आहेत. ब्रेंटन टेरंट नामक मुख्य हल्लेखोराने या हल्ल्याचे फेसबुकवरून लाईव्ह स्ट्रीमिंग (थेट प्रक्षेपण) केले होते. दरम्यान, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बंदूक कायद्यामध्ये बदल करण्याचा मोठा निर्णय न्यूझीलंडने तातडीने घेतला आहे.

28 वषीय ब्रेंटन टेरंट ऑस्ट्रेलियन नागरिक असून त्याला ख्राईस्टचर्च येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याला बेडय़ा घालण्यात आल्या होत्या. कैद्याचा सफेद रंगाचा पोषाख त्याने घातल्याचे छायाचित्रांवरून स्पष्टपणे दिसत होते. न्यायालयाने नेमलेल्या त्याच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केला नाही. छायाचित्रकारांकडे पाहून तो हसला असे स्थानिक वृत्तपत्राने नमूद केले आहे.  पुढील न्यायालयीन प्रक्रियेसाठी त्याला दक्षिण आइसलँड उच्च न्यायालयात त्याला 5 एप्रिलला हजर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. त्याच्यावर आणखी आरोप ठेवण्यात येतील असे पोलिसांनी सांगितले.

सुरक्षाविषयक कायदे बदलण्याचा विचार सुरू

हल्लेखोराच्या अंदाधुंद गोळीबारात 49 निष्पापांचे बळी गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या न्यूझीलंड सरकारने सुरक्षा व्यवस्था आणि बंदूक कायद्यामध्ये बदल करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार संबंधित विभागाला नवीन प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, शुक्रवारी मशिदींमध्ये झालेला हल्ला हे दहशतवादी कृत्य असून बंदूक कायद्यामध्ये बदल करणार असल्याचे पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनीही स्पष्ट केले आहे.

हल्लेखोराच्या जाहीरनाम्यात

भारताविरोधातही द्वेषभावना

दहशतवादी ब्रेंटन टेरंटचा जाहीरनामा समोर आला आहे. या 37 पानी जाहीरनाम्यात भारत, चीन, बांगलादेश, श्रीलंका आणि तुर्कस्थान या देशांचा उल्लेख असून त्याने भारतीयांना आक्रमणकारी ठरवले आहे. भारत, चीन आणि  तुर्कस्थान हे तीन आक्रमणकारी देश असून पूर्वेकडचे हे देश शत्रू असल्याचे त्याने जाहीरनाम्यात म्हटले आहे. ‘द ग्रेट रिप्लेसमेन्ट’ असे या जाहीरनाम्याचे शीर्षक असून हे आक्रमणकारी कुठून आले किंवा कधीही आले असतील तरी त्यांना युरोपच्या भूमीवरून हद्दपार केले पाहिजे. ते आपले लोक नसून ते आपल्या भूमीवर राहत आहेत. त्यांना इकडून बाहेर काढलेच पाहिजे असे टेरंटने जाहीरनाम्यात म्हटले आहे.

Related posts: