|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » काँग्रेसची नववी यादी जाहीर ; अकोल्यातून हिदायत पटेल लढणार

काँग्रेसची नववी यादी जाहीर ; अकोल्यातून हिदायत पटेल लढणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची नववी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत बिहार, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिनाडूच्या एकूण 10 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील अकोलासाठी हिदायद पटेल, रामटेक किशोर गजभिये, चंद्रपूर सुरेश धानोरकर, हिंगोली सुभाष वानखेडे यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. दरम्यान लोकसभेतील संख्याबळ वाढीसाठी कोणतीही रिस्क न घेण्याचा काँग्रेस पक्षाने एकमुखी निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी अशोक चव्हाण यांनांच लोकसभा निवडणूक लढवण्याची सक्ती केली आहे. याआधी अशोक चव्हाणांनी राज्याच्या राजकारणात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळेच लोकसभेसाठी पत्नी अमिता चव्हाण यांचे नाव पुढे करण्यात आले होते. राज्याच्या राजकारणात परतण्याचे वेध लागल्यानेच नांदेडमध्ये पत्नीचे नाव लोकसभेसाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुढे केले होते, पण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हा प्रस्ताव फेटाळून अशोक चव्हाणांनाच लोकसभा लढण्यास सांगितले आहे. पक्षाचे दुसरे खासदार राजीव सातव हे गुजरातमधील जबाबदारीमुळे निवडणुकीच्या रिंगणाबाहेर पडले आहेत. रत्नागिरीचा उमेदवार बदलला जाणार नसला तरी चंद्रपूरवरून झालेल्या वादामुळे पक्षात फेरविचार सुरू झाला आहे.