|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » भाजपा ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करत आहे, अडवाणी अन् जोशींना तिकीट न दिल्याचे केजरीवालांना दुःख

भाजपा ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करत आहे, अडवाणी अन् जोशींना तिकीट न दिल्याचे केजरीवालांना दुःख 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

लोकसभा निवडणूक 2019ची रंगत चांगलीच चढली आहे. या निमित्ताने  राजकीय पक्षही एकमेकांवर चिखलफेक करण्याची एकही संधी सोडत नाही. सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांची नावे जाहीर करत आहेत. जस जशी उमेदवारांची नावे जाहीर केली जात आहेत, तस तसे राजकीय वातावरण तापत चालले आहे. भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीतून अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू दिला आहे. अशाच नेत्यांनी भाजपाच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नावे वगळण्यात आली आहेत. आता या मुद्द्यावरून भाजपावर विरोधकांनीही निशाणा साधला आहे.

 

लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नावे उमेदवारांच्या यादीतून वगळल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही दुःख झाले आहे. अरविंद केजरीवाल ट्विट करत म्हणाले, लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींना तिकीट नाकारून भाजपाने ज्येष्ठांचा अपमान केला आहे. ते हिंदू संस्कृतीच्या विरोधातही आहे. हिंदू धर्मात आपल्याला ज्येष्ठांचा सन्मान करणं शिकवण्यात आले आहे. आमचे  सरकारने दिल्लीत सुशासन स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार त्यामध्ये अडचणी आणत आहे. सीसीटीव्हीसाठी आम्ही गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न करत आहोत. परंतु केंद्र सरकारने तसे होऊ देत नाही.