|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » leadingnews » माझ्या सभांचा खर्च मोजण्यापेक्षा तुम्ही मारलेल्या थापा मोजा : राज ठाकरे

माझ्या सभांचा खर्च मोजण्यापेक्षा तुम्ही मारलेल्या थापा मोजा : राज ठाकरे 

ऑनलाईन टीम / सोलापूर :

गेल्या पाच वर्षात 14 हजार शेतकऱयांनी आत्महत्या केल्या, आगोदरचे वाईट म्हणून हे आले ते त्यांच्या पेक्षा वाईट निघाले. आमच्या सभांचा खर्च मोजण्यापेक्षा तुम्ही पाच वर्षात मारलेल्या थाप मोजल्या तरी बस झाले. जो तुमच्या समोर मोबाईलवरून एक नवीन येते या आधी झाले ते विसरून जाता. मोदींनी जी स्वप्ने दाखविली त्याबद्दल एक अक्षर बोलत नाहीत. जवानांच्या नावानी मते मागत आहेत. जाती पातीचे राजकारण करून फसवत आहेत. अशी टिका राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर केली.  

नोटाबंदीने 4.50 ते 5 कोटीलोकांच्या नोकऱया गेल्या. हे सर्व विचारू नये मग काय दंगल घडवणे जातीपातीत भांडणे लावणे असले उद्योग करतात. महाराष्ट्रात कोणत्याही उद्योगात येथील तरूण-तरूणींना काम मिळाले तर येथे आरक्षणाची गरज नाही. परंतु येथे बाहेरून येणारी माणसे भरली जाता आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक करणार आहोत पाच वर्षे बोलत आहेत. कुठे ते, स्मारकाची कल्पना मी दिली स्मारकाच्या जागी जगातील सर्वात मोठे ग्रंथालय उभे करा. महाराजांचे स्मारक करणार होते, गडकिल्ले हे आमच्या महाराजांची खरी स्मारके आहेत ती निट बनवा. पण यांना ते करायचे नाही. माझ्याकडे प्रचाराचा खर्च मागताय पाच वर्षात 4 हजार 880 कोटी फक्त जाहिरातीवर खर्च केला त्यापण फेल झालेल्या योजना याचा हिशोब द्या, माझ्याकडे खर्च मागत आहात. त्यांच्याकडे आज दाखविण्यासारखे काही नाही.