|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » पुरोगामी चळवळी भोपाळमध्ये जाऊन करणार साध्वीच्या विरोधात प्रचार

पुरोगामी चळवळी भोपाळमध्ये जाऊन करणार साध्वीच्या विरोधात प्रचार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

साध्वीच्या विरोधात भोपाळ लोकसभा मतदारसंघात जाऊन प्रचार करण्याचा निर्णय पुणे, मालेगाव, मुंबईतील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी घेतला आहे. भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजपची उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह हिने शहीद अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर जरी तिने माफी मागितली असली तरी तिच्याबद्दल समाजात रोष आहे. आजही तिने बाबरी मशिद पाडण्यासाठी प्रयत्न केला, आता राममंदिर बांधू असे विधान केले आहे. त्यामुळे तिच्याविरोधात समाजात संताप आणखी वाढला आहे.

त्यामुळे साध्वी प्रज्ञा च्या विरोधात प्रचार करण्याचा पुरोगामी चळवळींनी वीडा उचलला आहे. निवृत्त न्या. बी. जी. कोळसे-पाटील, राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड, राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार, मालेगावातील कुल जमात-ए तंजीमचे अध्यक्ष मौलाना अब्दुल हमीद अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली स्फोटातील मृत्यू पावलेल्यांचे नातेवाईक, जखमी, तसेच कार्यकर्त्यांचे पथक भोपाळला जाणार आहे. बॉम्बस्फोटातील प्रज्ञासिंहचा सहभाग, सहकाऱयांसोबत तिने रचलेला कट, करकरे यांच्या नेतृत्वाखालील एटीएसचा तपास, न्यायालयात सादर केलेले आरोपपत्र आणि ‘एनआयए’ने केलेला बदल आदींबाबत सविस्तर माहिती तेथील मतदारांपुढे ठेवली जाणार आहे.