|Monday, August 26, 2019
You are here: Home » उद्योग » सर्वाधिक पासवर्ड हॅकची यादी जाहीर

सर्वाधिक पासवर्ड हॅकची यादी जाहीर 

युकेच्या सायबर सिक्युरिटी सेंटरकडून माहिती सादर

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

जगात प्रत्येकजण सोशल मीडियापासून ते मोबाईल लॉकपर्यंत सर्वत्र पासवर्डचा वापर करत असतो. आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड अत्यंत महत्वाचा असून तो पासवर्ड मजबूत नसेल तर तुमची माहिती पासवर्ड हॅक करून चोरता येणे सोपे आहे.

बऱयाचदा अनेकांकडून लक्षात राहील आणि ओळखायला सोपा जाईल असा पासवर्ड ठेवण्यात येतो. परंतु असे करणे महागात पडू शकते. नुकतेच सर्वाधिक हॅक होणाऱया पासवर्डची यादी जाहीर केली आहे. युकेच्या सायबर सिक्युरिटी सेंटर (एनसीएससी) ने जाहीर केलेल्या यादीत 123456 हा पासवर्ड 2 कोटी 30 लाख अकौंटचा हॅक झाला.

अधिक मजबूत पासवर्ड निवडा

काही युजर्स फुटबॉल टीम, बॅटमॅन आणि सुपरमॅनसारेखे सुपरहिरो आणि पोकेमॉनसारख्या कार्टून कॅरेक्टरची नांवेही पासवर्ड म्हणून वापरतात. जर तुमचा एखादा पासवर्ड यापैकी एक असेल तर वेळीच सावध व्हा अन्  मजबूत पासवर्ड निवडा, असा सल्ला सिक्युरिटी एक्सपर्ड यांनी दिला आहे.

सर्वाधिक हॅक पासवर्ड…

123456……. 2.32 कोटी

  1. 123456789. 77 लाख

qwerty…….. 38 लाख

password…. 36 लाख

1111111….. 31 लाख

12345678… 29 लाख

abc123……. 28 लाख

12345678        25 लाख