ऑनलाईन टीम / लखनऊ :
राम मंदिराचा पाया खोदण्यापूर्वी श्रीराम जन्मभूमी परिसरात 12 टेस्ट पिलर्स उभारण्यात आले आहेत. 28 दिवसांनंतर आयआयटी चेन्नईतील तज्ज्ञांकडून या पिलर्सच्या भारक्षमतेची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर राममंदिरासाठी 1200 खांब उभारण्याचे काम सुरू होईल.
एल अँड टी या संस्थेतील तज्ज्ञांच्या मते मंदिराचा पाया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जून 2021 पर्यंत निश्चित करण्यात आले आहे. त्याअंतर्गत 13,000 चौरस मीटर क्षेत्रफळात एक मीटर व्यासाचे 1200 खांब उभारण्यात येणार आहेत. ते 100 फूट खोल असतील. 100 मीटर अंतरावर एका सेटमध्ये चार-चार खांबांचे तीन संच तयार करण्यात आले आहेत.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी सांगितले की, राम मंदिरासाठी 12 टेस्ट पिलर पूर्ण झाले आहेत. आता त्याच्या क्षमतेची चाचणी करावी लागेल. त्यासाठी आयआयटी, चेन्नईचे तज्ज्ञ वाट पाहत आहेत.