मुंबई / ऑनलाईन टीम
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या आमिर खान क्वारंटाइन आहे. आमिर खानने दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत ‘वर्षा’वरील एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यासोबत हजेरी लावणाऱ्या अभिनेता आमिर खानलाही करोना झाला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्याच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे.
बॉलिवूडमध्ये कोरोन केस वाढत आहेत. रणबीर कपूर, कर्तिक आर्यन आणि आता आमिर खानला देखील कोरोनाची लागण झाली आहे. आमिर खानच्या टीमने त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करणार असल्याचे सांगितले आहे.