वृत्तसंस्था /मुंबई :
भारतामध्ये कोविड आणि लॉकडाऊनच्या प्रभावामुळे सोने आयात मोठय़ा प्रमाणात घसरली असल्याचे पहावयास मिळाले आहे. यासह दुसऱया बाजूला एप्रिल ते जून तिमाही कालावधीत सोने मागणी जवळपास 70 टक्क्मयांनी घटून 63.7 टनावर राहिली असल्याची माहिती जागतिक सुवर्ण परिषदेच्या(डब्लूजीसी) अहवालामधून देण्यात आली आहे.
कोविड 19 च्या कारणामुळे देशात लॉकडाऊनची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. याच कालावधीत सोने विक्रीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे पहावयास मिळाले आहे. या अगोदरच्या 2019 च्या वर्षातील दुसऱया तिमाहीत भारतात सोन्याची मागणी 213.2 टन इतकी राहिली आहे.
दुसऱया तिमाहीत सोने मागणीसंदर्भात डब्लूजीसीच्या अहवालानुसार भारतात सोने मागणी 57 टक्क्मयांनी घटून 26,600 कोटीवर आली आहे. जी मागणी वर्षातील समान तिमाहीत 62,420 कोटीवर राहिली होती. यावेळी सोन्याच्या दागिन्यांची मागणी 74 टक्क्मयांनी घटून 168.6 टनावरुन 44 टनावर आली आहे.