युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत होणार समावेश
मेघालयात लोक आणि निसर्गादरम्यान सामाजिक-सांस्कृतिक, सामाजिक आणि वनस्पतिक संबंधांना उजाळा देत 70 हून अधिक गावांमध्ये आढळून येणाऱया ‘लिव्हिंग रुट ब्रिज’ला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या संभाव्य यादीत सामील करण्यात आले आहे.
‘जिंगकिएंग जेरी ः लिव्हिंग रुट ब्रिज कल्चरल लँडस्केप्स ऑफ मेघालय’ला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाच्या संभाव्या यादीत सामील करण्यात आल्याचे सांगताना र्आंनंद होत असल्याचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी सोशल मीडियावरून म्हटले आहे.
ग्रामस्थांनी सुमारे 10-15 वर्षांच्या कालावधीत जलाशयांच्या दोन्ही काठांवर ‘फिकस इलास्टिका’ वृक्षांच्या मूळांद्वारे ‘लिव्हिंग रुट ब्रिज’ विकसित केला आहे. वृक्षाच्या मूळांद्वारे या पूलांची निर्मिती करण्यात येते. सध्या राज्याच्या 72 गावांमध्ये फैलावलेले सुमारे 100 ज्ञात ‘लिव्हिंग रुट ब्रिज’ आहेत.
मेघालयाचे लिव्हिंग रुट ब्रिज हे लोक आणि निसर्गामधील सामाजिक-सांस्कृतिक, सामाजिक आणि वनस्पतिक संबंधांना दर्शवित असल्याचे उद्गार भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. के. विजय राघवन यांनी काढले आहेत. मागील वर्षी मेघालयात रुट-ब्रिजवर एक राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आले होते.