प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यामध्ये ज्यांचा पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला आहे, अशा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी केल्या आहेत. यामध्ये ३४ सहाय्यक पोलीस फौजदार, ७४ पोलीस हवालदार, ९१ पोलीस नाईक, ९२ पोलीस शिपाई यांचा समावेश आहे.
ज्या पोलिस कर्मचाऱ्यांनी कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच काही अडचणींमुळे बदली मागितली होती, त्यांच्याही यामध्ये समावेश करण्यात आला असून त्यांनी मागितलेल्या तीन पोलिस ठाण्यापैकी एका पोलीस ठाण्याकडे त्यांची बदली केली आहे. लवकरच या पोलिसांना नवीन पोलिस ठाण्यात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.