पाच ते सहा एकरमध्ये तलावाच्या कामाला गती : ता. पं. कार्यकारी अधिकाऱयांकडून पाहणी
प्रतिनिधी /बेळगाव
उद्योग खात्री योजनेतून बेळगाव तालुक्मयाचा विकास साधण्यात येत आहे. विशेष करून तलावांच्या खोदाईसाठी मोठय़ा प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे पाणीपातळी वाढविण्यासाठी मोठे प्रयत्न होत आहेत. परिणामी बेळगाव तालुक्मयातील विविध गावांमध्ये तलावांची निर्मिती झाली आहे. याचबरोबर सुळेभावी येथेही एका मोठय़ा तलावाची निर्मिती करण्यात येत आहे. 5 ते 6 एकरमध्ये हा तलाव करण्यात येत असून याचा फायदा परिसरातील नागरिकांना होणार आहे.
सुळेभावी ग्रा. पं. हद्दीत येणाऱया या तलावामुळे परिसरातील शेतकऱयांना याचा मोठा फायदा होणार आहे. विविध ठिकाणी अधिकाऱयांनी तलाव खोदाईचे काम हाती घेऊन कामगारांना नियुक्त केले आहे. नुकताच 1200 कामगारांना काम देत सुळेभावी येथे तलावखोदाई करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सुळेभावी येथे सध्या तलावाच्या खोदाईसाठी उद्योग खात्रीतील कामगारांना काम मिळाले असून यानंतर शेतामधील पाणंद रस्त्याच्या डागडुजीसाठी उद्योग खात्रीतून प्रयत्न करण्यात येणार आहेत.
या तलावाच्या कामाचा आराखडा तयार करण्यात आला नव्हता. त्यामुळे तेथील कामगार वारंवार कामाची मागणी करत होते. त्यामुळे परिसरात तलाव खोदण्यासाठी 1200 कामगारांना काम देण्यात आले. ता. पं. चे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ता. पं. चे साहाय्यक सचिव राजेंद्र मोरबद यांनी उद्योग खात्रीतील कामांना गती दिली आहे. सुळेभावी येथे 6 एकरात तलावाचे काम करण्यात येत असल्याने पाणीसाठाही मोठय़ा प्रमाणात होणार आहे.
1 कोटी 10 लाख लीटर पाणीसाठण्याची शक्यता
सध्या बेळगाव तालुक्मयातील सर्वात मोठा तलाव सुळेभावी येथे होणार असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. या तलावात 1 कोटी 10 लाख लीटर पाणीसाठा होण्याची शक्मयता आहे. सध्या याचे काम सुरू केले असून भविष्यात याची खोदाई आणि उंचीही वाढविण्यात येणार असल्याचे पीडीओ श्रीदेवी हिरेमठ यांनी सांगितले.
बेळगाव तालुक्मयात दररोज 12 हजारांहून अधिक कामगार उद्योग खात्रीतून काम करणारे आहेत. आता ही संख्या वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात कामांना गती देण्याचे काम करण्यात येत आहे.